शनिवार, ४ जुलै, २०२६

मुस्लीम तेली . किनवट

किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आहे आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणारा हा समुदाय आहे. यांची भाषा केली आहे ज्यावर राजस्थान युपी येथील भाषेचा प्रभाव दिसून येतो. हा समुदाय मनमिळावू आहे इतिहासामध्ये पाहिले तर या समाजाने देशाच्या संरक्षणासाठी संघर्ष देखील केलेला आहे राजस्थान उत्तर प्रदेश या मूळ घटक राज्यांमधून भ्रमण कधीच ही जात महाराष्ट्रात आलेली आहे शुद्ध तेलाचा व्यापार करणे आणि त्याद्वारे उपजीविका परिवाराचा उदरनिर्वाह करणे हे कार्य ही जात करते. ऐतिहासिक विकासाच्या कालखंडात राजस्थानमधील 153 तेली जातीमधील 53 जाती ह्या त्यातून फुटून इस्लाम धर्माचा स्वीकार त्यांनी केला त्यामुळे मुस्लिम समुदायातील तेली समाजात 53 गोत्र दिसून येतात. या जातीवर भारतीय परंपरेचा प्रभाव आहे त्यामुळे काही कुटुंबामध्ये भारतीय संस्कृतीचे पालन केल्या जाते. या समाजातील पुरुष हे दीपाळ गोर वर्ण तसेच क्षणाक्ष दिसून येतात व्यापारामध्ये चतुर ही जात आहे कौशल्यपूर्ण व्यापार करणारी ही जात आहे किनवट परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम तेली आहेत या जातीमधील स्त्रिया देखील फार सुंदर मनमिळावू हुशार कुटुंब वत्सल्य आहे. मुला मुलींचे विवाह हे दुसऱ्या गोत्रातील विवाह संबंध जोडल्या जातात परिवारामध्ये विशिष्ट पद्धतीने लहान मुला मुलींवर संस्कार केल्या जातात एका कुटुंबात दोन आपत्य हे सरकारी नियमांचे पालन देखील या समुदायात केल्या जाते इतिहास कालखंडात अनेक कारणांमुळे  या समुदायाने हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात प्रवेश केला. चव्हाण, बडगुजर, जाधव अशा अनेक आडनावाची कुटुंबे या समुदायात दिसून येतात. 

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

मथुरा लभान समाज-किनवट

किनवट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मथुरा लभान हा समाज राहतो हा समाज गाई धनाचे पालन पोषण करतो. लाखा मध्ये गाई बैल यांची संख्या असते संपूर्ण भारत तसेच विदेशामध्ये देखील पशुधन घेऊन जाणारी भटकी जात म्हणून याला ओळखल्या जाते बंजारा या समुदायातील एक जात ही मथुरा लहान आहे एकूण 14 जाती ह्या बंजारा समाजामध्ये आहेत प्राचीन व मध्ययुगीन कालखंडात स्वदेशी सत्तेच्या संरक्षणासाठी मथुरा लगान समाजाने मोठे योगदान दिलेले दिसून येते देशी सत्तांना अन्नधान्य पुरवठा करणे त्यासाठी गाई बैल यांच्या धान्य पोहोचविण्यासाठी  पावसाळा हिवाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये आकाश हेच छत असलेली ही जमात कशा पद्धतीने निसर्गाच्या संकटाचा सामना करते हे जाणून घेण्यासारखे आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल दल दल यापासून संरक्षण व्हावे यासाठी ज्या ठिकाणी ही जमात जात होती त्या ठिकाणी हे मुरूम खडक असलेल्या डोंगरावर आपले वस्ती स्थान करत होती त्यामुळे चिखल होण्याचा प्रश्न नाही गाई ढोर आणि त्यांना खाण्यासाठी चारा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असे सन 1883 च्या सेटलमेंट ॲक्ट कायद्यानुसार या जमातीला गुन्हेगार जमात म्हणून ब्रिटिशांनी घोषित केले होते यामुळे ज्या ठिकाणी ही जमात जाईल तेथील समाज गुन्हेगार म्हणून या जातीला समजत असे हा ब्रिटिश काळात साम्राज्याची देण होता त्यामुळे या कायद्यातून मुक्त होण्याचे प्रयत्न या समाजाने केले होते 1960 च्या कायद्यामुळे या सेटलमेंट ऍक्ट कायद्यातून सुटका झाली त्यामुळे मुक्त हे जात झाली त्या करिता भटक्या जमाती म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये या जमातीचा समावेश करण्यात आला 
 या समाजातील स्त्री-पुरुष हे खूप सुंदर आणि गोर आहेत चेहरा अत्यंत तेज आणि सुंदर आहे स्त्रिया तर या समाजात खूप सुंदर असतात स्त्रियांना महालक्ष्मीचे रूप समजल्या जाते ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल ते कुटुंब धन्य होत असे कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे भाग्याचे लक्षण होतं आहे मुलगी झाल्यानंतर त्यांची विशिष्ट प्रथा आहे दुर्गा मातेची पूजा ही करण्यात येते मुलाचं बारसं केल्या जाते तर मुलीचं वेगवेगळ्या पद्धतीने वयानुसार कार्यक्रम घेण्यात येतात त्यांचे नामकरण विशिष्ट पद्धतीने ठेवल्या जातात पुरुष हे धष्टपुष्ट तर स्त्री ही आकर्षक सुंदर आहेत 
.
 तांड्याच्या मध्यभागी नायकाचे घर किंवा तंबू हे असंच तसेच त्यांच्यासमोर हनुमान हा दक्षिणमुखी मारुती मंदिर असाच आध्यात्मिक दृष्टिकोनातून मथुरा हा समुदाय श्रीकृष्णाचे भक्त आहेत श्रीकृष्णाचा काला हा तर फार चविष्ट बनविल्या जाते विशिष्ट पद्धतीने गव्हाचे चपात्या बनवल्या जातात चविष्ट असतात श्रीकृष्णाचा काला असे त्याला म्हणतात श्रीकृष्णाची हंडी हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील प्रत्येक वर्षी घेण्यात येतो मुलींना या समाजात हुंडा देण्यात येतो मुलांकडून हुंडा घेतल्या जातो ही एक चांगली प्रथा स्त्रियांसाठी आहे प्रगत समाजासाठी समाजासाठी हा एक आदर्श आहे पुरुष हा कारभारी असतो तर त्याला साथ देणारी स्त्री ही अर्धांगिनी असते कुटुंबाच्या प्रत्येक निर्णयांमध्ये पुरुष हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो तर स्त्री ही त्यामध्ये सहभाग घेत असते लाखा लहान असे देखील म्हटले जाते ज्याकडे लाख बैल गाई असतात त्याला लाखा म्हटल्या जातं
 या समुदायाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना मोठ्या संख्येने असलेले जनावरे यांचा पालन पोषण कसे करतात या समुदायाचा नायक हा प्रचंड हुशार असतो तो ज्या भूप्रदेशात जातो तेथे सर्वप्रथम परीक्षण निरीक्षण संशोधन हे करतो तेथील भौगोलिक परिसरातचे संशोधन केल्यानंतर तो जागा निवडतो या परीक्षांमध्ये मातीच्या वासावरून या ठिकाणी वीर खणल्यास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल का नाही हे जाणून घेतो तसेच मोठ्या प्रमाणात साऱ्याची व्यवस्था या परिसरात होते का हे बघितले जाते तेव्हाच तांड्याचा नायक हा तेथे आपला तांडा वसई तो हिवाळ्या या ऋतूमध्ये तर परिस्थिती सर्वसामान्य असते थंडीपासून बचाव व्हावा म्हणून गोधडे व अंगरखा हा परिधान करण्यात येतो 
 आसपासचा परिसर हा स्वच्छ ठेवल्या जातो तसेच दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता राखण्यासाठी दुधाचा वापर करण्यात येतो तसेच शरीर हे सुंदर व्हावं याकरिता तुपाचा वापर हा करण्यात येतो घराच्या विशिष्ट कोपऱ्यात स्नानगृह असते तसेच अंगण हे मोठे असते कारण काय ढोरे बांधण्याची व्यवस्था तसेच गोबराचा सडा हा मोठ्या प्रमाणात टाकल्या जातो पारंपारिक ज्ञानानुसार गोबराच्या सड्यामुळे सूर्यकिरण गोबरा चाकणावरून व्यक्ती व परिवाराच्या अंगावर पडतो त्यामुळे विशिष्ट ऊर्जा आणि रोगराई पासून संरक्षण हे होत असते गाई तसेच म्हशीचे विविध घटक हे मानव जातीला खूपच हितकारक असतात ज्या समुदायांमध्ये जनावराची संख्या ही जास्त असते त्या ठिकाणी संकट हे कमी येतात कारण जनावरे ती संकटे दूर लोटतात सर्वात आधी या जनावरांनाच संकटाची चाहूल लागते.
 तेज बहादुर या नव्या शिक धर्माच्या गुरु सोबत समाजाचा संपर्क आला त्यामुळे शीख धर्मा च्या परंपरांचे पालन करताना देखील हा समाज दिसून येतो त्यामुळे या समाजात गुरुद्वारे देखील बांधलेले दिसून येतात
 किनवट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मथुरा लभाण   ताड्यांची संख्या थारा चंद्रपूर सावरी नीच पूर्वाई मांडवी मांडवा अशा अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने आहेत.

बुधवार, १० जून, २०२६

पैनगंगा नदी आणि किनवट तालुक्यातील प्रमुख धरणे

विंध्य पर्वताच्या उत्तर दिशेतील उतारा मध्ये पैनगंगा या नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे 
  पेरसापेन या आदिवासी गोंड देवतेच्या नावावर या नदीचे  पैनगंगा हे नाव पडले. किनवट तालुक्यामधील मोठ्या संख्येने खेडेगाव या नदीकाठी वसलेले आहेत त्यामुळे पेनगंगा देवाची गंगा आहे या नदीमुळे हा परिसर जलमय शिवार बनलेला आहे हिमायतनगर तालुक्यातील या नदीचा प्रवेश हा किनवट तालुक्यात होतो तर विदर्भाच्या सर्दी वरून आंध्रामध्ये जाते अंकेश्वर या पलीकडे जाऊन ही आंध्र प्रदेशात मिसळते या नदीवर अनेक बंधारे बांधण्यात आलेले आहे त्यापैकी सहा प्रमुख बंधारे आहेत.

शनिवार, ३० मे, २०२६

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा
 जन्म 
     चोंडी या सह्याद्री पर्वताच्या रांगेत  असलेल्या गावात
 31 मे 1725 रोजी झाला.
       त्या काळात भारत देशा मध्ये मुघल साम्राज्य कमकुवत होत होते आणि मराठा साम्राज्य प्रस्थापीत  होते.
कुटुंब
   वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशिलाबाई शिंदे होत्या.  प्रेरणास्थान :
     सासरे मल्हारराव होळकर हे होते . 
संकटात धैर्य .
         1754 मध्ये पती खंदार राव होळकर यांचा युद्धात मृत्यू झाला त्यानंतर सती जाण्याचा प्रघात असताना सासरे मल्हारराव होळकर यांच्या विनंतीवरून त्यांनी सती जाणे टाळले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी समाजसेवा आणि राजकारभागाचा मार्ग स्वीकारला.
 युध्दात पती  आणि पुत्र यांच्या निधनानंतर राज्यात अस्थिरता निर्माण झाली होती.
     1767 मध्ये त्यांनी मालवा राज्याची सूत्रे हाती घेतली स्पर्धेचा विश्वास संपादन करून राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली राज्यावर आक्रमण किंवा बंडखोरीचे चिन्हे दिसल्यास त्यांनी सैन्याचे नेतृत्व केले.
तुकोजीराव होळकर
      यासारख्या कुशल सेनापतीच्या मदतीने राज्यात चे संरक्षण केले.
        मंदिरांची पुनर्बांधणी
         त्यांनी आपल्या कालखंडात श्रद्धास्थान असलेले मंदिराची पुनर स्थापना केली.
 काशी विश्वनाथ मंदिर 1780
 सोमनाथ मंदिर
,ओमकारेश्वर मंदिर 
केदारनाथ मंदिर,
 बद्रीनाथ मंदिर
 जगन्नाथ मंदिर, महाराष्ट्रातअनेक मंदीर,
रामेश्वरम मंदिर अशा अनेक महत्त्वपूर्ण मंदिराची उभारणी दुरुस्ती त्यांनी केली.
त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळा उघडल्या
 काशी विश्वनाथ 
रामेश्वरम, बद्रीनाथ जगन्नाथ, अशा अनेक तीर्थस्थळावर धर्मशाळा व यात्रेकरूंसाठी निवासस्थानी बांधली.
दळन वळन
       रस्ते व व्यापार देखील त्यांनी वाढविला मालवा राज्यात नवीन रस्ते बांधले.
    रस्त्याच्या कडेला झाडे लावली प्रवाशांसाठी विश्रामगृह उभारली व्यापारी 
   शेतकरी आणि कारागिरांना संरक्षण दिले.
माहेश्वर येथे नर्मदा नदीवर सुंदर घाट बांधले व दुरुस्त केले. वाराणसी येथे मनीकरनीका का घाट,दत्ताश्वे मेघ घाट दुरुस्ती केली 
देशभरात तीर्थक्षेत्रामध्ये विहिरी तलाव,
 पाणी पिण्यायोग्य विहरी
अनेक स्नान घाट उभारले  झाला. कल्यान कारी प्रशासन केले.

शुक्रवार, २९ मे, २०२६

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

 " गरीब परिस्थिती अडथळा नसते, शिक्षण आणि जिद्द माणसाला सर्वोच्च स्थानी पोहोचू शकते "
         हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरून समजते .
  सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 888 रोजी तिरुपतनी या खेड्या गावात झाला त्यांचे घर साधारण सदन होते. 
      त्यांचे वडील वीर स्वामी तर आई सीतम्मा यांचे कौटुंब होते.संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये भावंडे होती. 
 त्यांचे प्राथमिक शिक्षण त तिरुपत्नी येथे झाले तर उच्च शिक्षण तिरुपती या ठिकाणी झाले.
      त्यांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद हे होते. अधिकाधिक ग्रंथांचे वाचन करणे ही त्यांची खूप मोठी आवड होती.
      त्यांच्या जीवनाचा प्रवास प्राध्यापक- कुलगुरू उपराष्ट्रपती - राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास आहे..
 त्यांच्या कर्तृत्वामुळे आज त्यांचा जन्मदिवस  पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो..
       त्यांनी भारत देशाचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून 13 मे 1952 ते 12 मे 1962 पर्यंत भारतीय राष्ट्रपती म्हणून कार्य केले.
     तसेच दुसरे राष्ट्रपती म्हणून 13 मे 1962 ते 13 मे 1967 पर्यंत पद भूषविले 
       इसवी सन 1954 ला त्यांनी भारत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न हा पहिला नागरिक ठरले 
         विशेष म्हणजे भारतरत्न असामान्य कर्तृत्व व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींना दिल्या जातो
" सर्वपल्ली " हे गावाचे नाव आहे गावातील नागरिकांना आपल्या नावासमोर".सर्वपल्ली ' ' हे नाव लावावे लागते तशी त्या गावाची जुनी परंपरा आहे म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन असे त्यांचे नाव पडले होते 
     "तत्त्वज्ञान . या विषयाचे सूक्ष्म जाणकार व तज्ञ होते.
      त्यांनी मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेज मधून शिक्षण घेतले आणि पुढे म्हैसूर विद्यापीठ तसेच कलकत्ता विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड स्टेट प्राध्यापक म्हणून कार्य केले.
            म्हणून हिंदू तत्त्वज्ञान वेध शांतीचा संदेश दिला.
      सोवियत युनियन मध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्य केले. त्यांनी 40 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले:
       त्यामध्ये प्रमुख: 
1)इंडियन फिलॉसॉफी अँड आयडियालिस्ट,                          2)ऑफ लाईफ, द हिंदू व्ह्यूज लाइफ, 
  .    3) ईस्टर्न रिलीजन अँड वेस्टर्न थॉट्स .
            4)     द भगवत गीता
 17 एप्रिल 1975 रोजी त्यांचे निधन झाले.
      एकूण 86 वर्ष त्यांनी जीवन जगले.
    . शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. 
          शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार असतात म्हणून 'गुरुर्ब्रह्मा,गुरुर्विष्णु, गुरुर्देवो,महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नमः 
जी राधाकृष्णन यांच्या शिक्षकाप्रती असलेल्या प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करते.
   "मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या सर्जनशील हाताप्रमाणे शिक्षक मुलांना आकार देत असतात..
     

बुधवार, २७ मे, २०२६

महाराष्ट्र कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक

 वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषी तज्ञ, प्रगतिशील शेतकरी व राजनीतिज्ञ होते.. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सव्वा अकरा वर्ष हा सर्वाधिक काळ ते विराजमान होते. वसंतराव नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहूली या छोट्याशा खेड्या गावात सधन शेतकरी कुटुंबात एक जुलै 1913 रोजी झाला. ते हरितक्रांती पंचायतराज तसेच कृषी क्रांतीचे, रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.
   कृषी संस्कृतीचीपूर्ण स्थापना श्री वसंतराव नाईक यांनी केली. देशभरात नावलौकिक मिळविला आधुनिक भारतीय शेती आणि शेतकऱ्यांना त्यांनी महत्त्व दिले.
  "आधुनिक कृषी प्रधान भारताचे कृषी संत"
    या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत एकनाथराव पवार यांनी त्यांचे वर्णन केले.
      इसवी सन 1972 मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळा दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतनिसांची दूरगामी योजना राबविल्या.
   महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव नव्हती तर दुर्गामी स्वरूपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या.
    शेती आणि शेतकऱ्यांनी त्यांची नाळ कायम जुळली होती.           कठीण काळातही क्रांतिकारी कार्य त्यांनी केले त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा " जाणता राजा हरित योद्धा ' म्हणून संबोधण्यात येते
     माझी राष्ट्रपती भारतरत्न प्रवन मुखर्जी यांनी " वसंतराव नाईक हे भारत मातेचे छोटे सुपुत्र आहे ' या शब्दात त्यांचा गौरव केला.
    महानायक वसंतराव नाईक हे एक नाव नसून शाश्वत विकासाची लोकाभिमुख विचारधारा आहे.

शनिवार, २३ मे, २०२६

श्रीहरी गुंटावार किनवट चे पहिले माजी आमदार 1952

 किनवट परिसरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये  आमदार श्रीहरी गुंडावार हे पहिले आमदार होते. किनवट हा आदिवासी तालुका आहे आज हा तालुका नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड जिल्हा हा मराठवाडा मध्ये येतो असे एकूण आठ  जिल्हे आहेत अशा जिल्ह्याचा एकमेव तालुका आदिवासी किनवट आहे हा परिसर पूर्वी आंध्र प्रदेश मध्ये येत होता त्यामुळे आदीलाबाद हा या तालुक्याचा जिल्हा होता त्यापूर्वी आशीफाबाद होत होते या परिसरातील प्रशासकीय लिपी ही फासली उर्दू ही होती त्यामुळे जमिनीचे घरादाराचे फेरफार हे या भाषेमधूनच पूर्वीला लिहिलेले आहेत ज्यांनी निजामा कडून घेऊन घेतले त्यांचे जमीनही या फेरफार झालेले आहेत या परिसराचा विकास त्यांनी केला होता.

किनवट माझी आमदार कै. किशन राव पाचपुते 1980-90

 इसवी सन 1980 ते 1990 या कालखंडामध्ये किनवटचे आमदार किशनराव पाचपुते होते त्यांनी या परिसराचा विकास व्हावा यासाठी भरीव कार्य केले त्यामध्ये विविध ठिकाणी तेरा आश्रम शाळा निर्माण केल्या तसेच सूत गिरणी ही उभारली या आदिवासी परिसरा च्या विकासाला गती त्यांच्यामुळे मिळाले होते आज ही सूतगिरणी बंद पडलेली आहे. त्या गाठी साखर कारखाना निर्माण करण्याची आज काळाची गरज आहे त्यामुळे तरुण वर्ग खाताना काम मिळेल.

इसवी सन 1660 रायबागन माहूरगडावरील पराक्रमी स्त्री

 सोळाशे साठ या दशकामध्ये माहूरगडावर सरस्वती बाई ही स्त्री होऊन गेली जिने आपला पराक्रम दाखविला 1660 मध्ये शाहिस्तेखान याने पुण्यात वर आक्रमण केलं त्यावेळेस औरंगजेबाने सरस्वती बाईला आठवण केले युद्ध मोहिमेवर देखील पाठविले त्यावेळेस खिंड लढवताना सरस्वतीबाई यांचा पराक्रम शिवाजी महाराज यांनी पाहिला ज्यावेळेस मोगल सरदार व सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराज यांना शरण आले त्यावेळेस सरस्वतीबाई ही पुरुषाच्या सैनिकाच्या देशामध्ये होती शिवाजी महाराज यांचे ज्ञान एवढे अफाट होते की या पराक्रमी स्त्रीने पुरुषाचा वेश परिधान केला तो ओळखले आणि ही स्त्री आहे म्हणून त्यांनी सांगितले प्रत्येक स्त्रीला छत्रपती शिवरायांनी माता बहीण समजून तिचा मानपान केला त्याच रीतीने सरस्वती या शूरवीर पराक्रमी तिचा देखील त्यांनी बहीण म्हणून शाल शिफळ साडी देऊन गौरव केला माहूरगडावर त्यांना मोगल बादशहा औरंगजेब यांनी त्यांना रायबागन बहाल केला होता अशा शूर वीर पराक्रमी स्त्रीचा गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता.

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे

दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे शिंगाडे हे असे एक फळ आहे की आरोग्याचे अनेक बिमार्‍यापासून संरक्षण करणारे आहे. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स प्रोटीन आहेत ज्यामुळे अनंत बिमाऱ्यासोबत लढण्याची ताकद देतात. त्यामुळे तरुण पण देखील चिरकाल टिकून राहू शकते एवढी ताकद या शिंगाड्या फळांमध्ये आहे शिंगाडे हे विशिष्ट रूतमध्येच येतात विशेषतः हिवाळ्यामध्ये तळ्याच्या काठी मोठा वेल या फळाचा येतो यावेळीला फळे शिंगाडे लागतात हिरवेगार असतात नंतर त्याला शिजविले की काळे होतात त्यामुळे अवश्य शिंगाडे हे या ऋतूमध्ये खावे

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

कच्चे मीठ खाणे आरोग्यास हानिकारक

दैनंदिन जीवन धकाधकीचे आणि पळापळीच्या आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती खाण्याबाबत जागरूक राहत नाही त्यामुळे अनेक बिमाऱ्या या जळतात ज्या जीवनभर सोडत नाही त्यामुळे जीवन समस्या लोकांनी वेढले जाते या समस्येवर महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे कच्चे मीठ खाऊ नये तसेच बाहेरील पदार्थ देखील खाऊ नये यामध्ये लोणचं हे खूप हानिकारक आहे लोणचं मोठ्या प्रमाणात कच्च्या मिठने बनते याचा सर्वात मोठा परिणाम शरीरावर होतो कच्चे मीठ हे आरोग्य खूप हानिकारक असते त्यामुळे लोक बपी शुगर हृदयरोग अशा अनेक गंभीर बिमारी होऊ शकतात त्यामुळे कधीही भाजी योग्य नीट टाकून शिजवलेले खावे त्यामुळे आरोग्य हे चांगले उत्तम राहते भाजीत एकदा मीठ टाकल्यानंतर जेवताना कधीही वरून कच्ची नीट टाकू नये यामुळे हाडे सुद्धा दिसून बनतात

मुळगा ही वनस्पती किडनीसाठी उपयुक्त

आज कालच्या दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य हा कामात व्यस्त आहे त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे जे मिळेल ते फूड म्हणू शकत असल्यामुळे किडनीच्या अनेक समस्या या दिवसेंदिवस निर्माण होताना दिसून येतात किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपन दररोज जेवणामध्ये जर मुलगा य वनस्पतीचे सेवन केलं तर आपली किडनी ही शुद्ध होत असते त्यामुळे येणाऱ्या रोगापासून मुक्त होण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करणे गरजेचे आहे मुलगा ही आपली किडनी मजबूत बनवते शुद्ध करते त्यामुळेही गुणकारी औषध आहे.

शनिवार, २० डिसेंबर, २०२५

पानफुटी ही आयुर्वेदिक औषध

पानफुटी ही पोटावरील अनेक रोगावर उपयुक्त अशी वनस्पती आहे कोणत्याही प्रकारचे पोट दुखले तर त्यावर गुणकारी औषध म्हणून ही पानफुटी वापरली जाते विविध रोगावर गुणकारी औषध म्हणून पानफुटी ही ओळखली जाते या वनस्पतीची एक पान जर प्राशन केले तर पोटातील रोग नष्ट होण्यास सुरुवात होते

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

काटशेवरी चे झाड गर्भपिशवी कॅन्सरवर उपयुक्त प्रा . संतोष गोपीचंद पवार

किनवट परिसरात निसर्गरम्य जंगल आहे. येथे पैनगंगा अभयारण्य टिटवी अभयारण्य आहे विविध वन औषधींनी हे जंगल व्यापलेले आहे. अनेक व नवसिद्धीपैकी एक वन औषध म्हणजे काठ शेवरी चे झाड हे झाड आजच्या आधुनिक युगात वाढत चाललेल्या स्त्रियांच्या गर्भ पिशवी कॅन्सरवरील उपयुक्त असे वन औषध आहे. योग्य पद्धतीने हे औषध जर महिलांना एक महिना दिले तर गर्भपिशवीचा कॅन्सर दूर होऊ शकतो.

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

काळे मिरे शुगर हृदयरोग व कर्करोगासाठी उपयुक्त औषध प्रा.संतोष गोपीचंद पवार

आजच्या धकाधकी जीवनामध्ये मनुष्य केमिकल युक्त आणि दूषित अन्न माहितीच्या अभावा मुळे खात आहे. केमिकल युक्त तेल फवारणीचे औषध मारलेले भाजीपाले गवताचे तेल म्हणजे चॉकलेट या अशा तळलेल्या बाहेरील पदार्थामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोगासारखे गंभीर रोग मनुष्याला होत आहे त्यामुळे दैनंदिन आयुष्य दुःखी आणि रोगीट होत आहे. 
    त्यामुळे आजची जीवनशैली ही आपण काय खातो कसे राहतो यावर आधारित आहे काही खा केमिकलच मिळणार असं म्हणून लोक मुद्दामहून काही पण खातात ते चुकीचे आहे जेवढं सांभाळून राहता येईल तेवढं सांभाळलं तर शरीर निरोगी राहू शकतात या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते तोंडामध्ये काय खायचं एक बार पोटात गेल्यावर ते बाहेर निघत नाही त्यामुळे विचार करून खायचा तरच आपलं शरीर निरोगी राहू शकते. 
   विज्ञान युगामध्ये विविध शोध लागत आहे या शोधा पैकीच एक महत्त्वाचा शोध म्हणजे काळे जिरे आहे या काळा जिरा चा उपयोग कसा करावा ज्यामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोग यासारखे गंभीर रोग दूर राहतील याचा वापर तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा तर याचे फायदे आपल्याला मिळतील..
    काळे जिरे एक छोटीशी चिंबट भारी करून गरम कोमट पाण्यात टाकून आठ दिवसाला एक वेळेस तरी प्राशन करावे त्यामुळे अशा गंभीर रोगापासून दूर राहू शकतो. हे एक उपयुक्त असे औषध आहे.

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५

प्रियदर्शनी विमानतळ राजगड प्रा संतोष गोपीचंद पवार

सन1971 ला श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या कै. श्री उत्तमरावजी राठोड हे खासदार होते. मराठवाड्यातील औरंगाबाद आजचे संभाजीनगर ला भेट देण्याचे नियोजित होते 
         मराठवाड्यात असलेले आदिवासी डोंगररागांनी व्यापलेले प्रसिद्ध ठिकाण म्हणजे किनवट  या परिसराला भेट त्यांनी द्यावी असे वाटत होते त्यामुळे भेट देण्याचे त्यांचे नियोजन होते. मराठवाड्यातील दर्शन म्हणून किनवट परिसराला देखील त्यांची भेट नियोजित होती.                              किनवट हा परिसर सुंदर निसर्गाने नटलेला तसेच येथील आदिवासी संस्कृती ही खूप छान आहे आणि येथील नृत्य परंपरा खूप महान आहे त्यासाठी बघण्याकरिता हे नियोजन होते या कारणाने राजगड हे भौगोलिक दृष्टिकोनातून एक चांगले ठिकाण आहे 
          जे विमानतळ साठी योग्य आहे इंदिरा गांधींचे विमान हे योग्यरीत्या लँडिंग हवे यासाठी ते नियोजन होते. परंत श्रीमती इंदिरा गांधींचा हा दौरा रद्द झाला. त्यामुळे विमान स्थळ निर्मितीचे कार्य अपूर्ण राहिले. 
           यानंतर या विमानतळाकडे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दिले या हेलिपॅड चा येथे योग्य पद्धतीने विकास व्हावा यावर त्यांनी भर दिला त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला डिमांड ठेवण्यात आले होते.
             1984 ते1990 च्या कालखंडात या हेलिपॅड मध्ये बसून मोठा गोल राऊंड वीस रुपयांमध्ये मारण्यात येत होता पुढे हे सुद्धा बंद झाले याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आज हे पडीत विमानतळ बनलेले आहे.

किनवट रेल्वे ऐतिहासिक विकास समस्या अणि उपाय:-प्रा.सतोष गोपीचंद पवार

सन 1947 वर्षी किनवट रेल्वेची सुरुवात झाली हा मार्ग तयार झाला या मार्गाचे काम 1932 पासून सुरू झाले होते.सन1967 ला किनवट स्टेशनची निर्मिती झाली पूर्वी जंगलामध्ये हे स्टेशन मोकळी जागा होती.सन2005 ला किनवट रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये या रेल्वे मार्ग ची उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री श्री लालूप्रसाद यादव हे किनवट येथे आले होते.
      ब्रॉडगे झाल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढ झाली कृष्णा एक्सप्रेस ही तिरुपतीला तर नंदिग्राम ही मुंबईला ,अकोला पॅसेंजर,,सत्रागाछी यागाडया सोडण्यात आल्या पण पुरेशा नाहीत.
      प्रवासी वेळेवर गेले तर मोठ्या शहरातील कामे होतील..अथिक गाड्या सोडण्यातची गरज आहे.
        महीला सुरक्षा होन गरजेचे आहे..
व्यापारासाठी गोदामांची निर्मिती करणे गरजेचे आहे 
तसेच स्वच्छता , प्रवासी मुक्कामाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे
.       पिण्याचे शुद्ध पाणी रेल्वे पोलीस करणे ची अधिक व्यवस्था दळणवळणाची अधिक व्यवस्था रेल्वे पोस्ट निर्माण करणे 
         रात्री वेळेस एलईडी बल्ब जागोजागी लावणे  रेल्वे तकिटांची सुविधा करणे जनतेसाठी रोजगार निर्माण करणे स्थानिक जनप्रतिनिधी आणि नानागरिकांशी मिळून रेल्वेने सार्वजनिक कामे करावी आजच्या किनवट ची गरज आहे..

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

माऊली मुंगसाजी महाराजांचे जीवन: एक प्रेरणादायी शिकवण प्रा संतोष गोपीचंद पवार

भगवान मुंगसाजी महाराज विदर्भाच्या मातीत जन्मलेले एक चमत्कारिक व समाजसुधारक संत होते. त्यांचे जीवन अध्यात्म समाजसेवा परोपकार यामध्ये गेलेले आहे.. साधेपणा ,भक्ती सत्य निष्ष्टवान लोकांच्या दु:खानात स्पर्श करूनमानसिक आणि भावनिक त्यांचा आधार बनत होते.  त्यांच्या प्रवचनातून  श्रद्धा सकारात्मकता व संयम  यांचा प्रभावी संदेश मिळतो.  
           महाराज यांचा जन्म 5 सप्टेंबर 1863 रोजी शुक्रवार या दिवशी आंध कुळा मध्ये झाला.धामणगाव हे   दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ  मध्ये आहे..
             वडिलांचे नाव विक्रम व आईचे नाव गमाई असे होते. आजोबाचे नाव भोपाजी व आजीचे नाव साखराबाई होते. मुंगसाजी माऊली यांचे घराणे आजोबाच्या काळापासूनच श्रीमंत होते ते सर्व समाजातील कर्ज व गरीब माणसांना नेहमी मदत करत अन्नदान हे तर त्या घराण्याचे आवडते कार्य होत                  हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली होती. अशातच या कुटुंबाला गरिबीचे दिवस केव्हा आले पत्ताही लागला नाही त्यामुळे मुंगसाजी महाराजांना गावातील व आपसातील काही व्यक्तीने त्रास देण्यास सुरुवात केली.
           परंपरेने मुंगसाजी महाराजांकडे गावचीपाटीलकी आली होती पण काही व्यक्तींनी त्यास विरोध केला. 
           अशा परिस्थितीमध्ये मुंगसाजी महाराज यांनी आपल्या मालकीच्या गढी मध्ये बारा वर्षे एकाच ठिकाणी तपस्या केली            विसाव्या वर्षीपासून बारा वर्षे सलग त्यांनी तप केले. तपामुळे मांडी व पोटरी एकच झाली होती 
         तप पूर्ण झाल्यानंतर तपासून उठल्यावर माऊलीच्या मांडीतून खूप रक्त वाहिले धामणगाव मध्ये तपा नंतरही समाजकंटक लोकांनी त्रास दिला होता.
             भुकेले असलेल्या जनतेला अन्नदान करणे
             कित्येक शेतकरी मजूर सामान्य नागरिक कर्जामध्ये डुबलेले असतात त्यांना कर्जमुक्त केले
             कित्येकांची लग्न जुळत नव्हते त्यांचे लग्न देखील लावून दिले .
              हजारो भक्तांना त्यांनी संकल्प सिद्धीने दुःखमुक्त केले त्यामुळे त्यांना महात्मा देखील म्हणण्यात आले
           त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती त्यामुळे त्यांना अनेक विद्वान लोक देखील भेटण्यास येत होते 
             अवतार मेहेर बाबा असेच एक संत होते त्यांनी देखील .
               1940 ते 45 या दरम्यान भेटतही दिल्या तसेच बडोद्याचे राजे यशवंतराव घाडगे हे त्यांनी सन 194119 47 पर्यंत सलग सहा वर्ष महाराजांची सेवा केली.
                  09.021947 मध्ये भगवान मुंगसाजी माऊली यांनी यशवंत घाडगे यांना बोलाविले व त्यांच्या समवेत शेगाव मूर्तिजापूर अकोला खामगाव नाशिक व मुंबादेवी च्या यात्रेमध्ये घेऊन जाण्यास सांगितले .
                  भगवान मुंगसाजी माऊली सन 1947 व 1952 पर्यंत 11 वर्ष मुंबईला एका जागी राहिले होते.
                     माऊली एकदा मुंबईला गेल्यानंतर परत धामणगावला आले नाही त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या हजारो भक्तांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली.
                   मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची ही माऊलींच्या नातेवाईकांनी भेट घेतली  परंतु तरीही मुंगसाजी माऊलींची भेट झाली नाही.
                 मुंगसाजी महाराजांच्या नातेवाईकावर व त्यांच्या भक्तावर पोलीस केस करण्यात आली.
                 ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याचा लढा चालू होता तर दुसरीकडे मुंगसाजी महाराज सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक व राजकीय असा मानवाच्या सर्व सामाजिक बंधनात अडकलेल्या मानवास त्यातल्या त्यात सर्वात जास्त बळी पडलेल्या बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे महान कार्य केले होते.
                     

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

2025 किनवट नगराध्यक्षपदी कोण निवडून येणार जाणूया जन्मताचा कल-राजकीय विश्लेषक प्रा संतोष गोपीचंद पवार

2025 च्या किनवट नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ वाढलेले आहे नागरिक सामाजिक संघटना युवक आणि व्यावसायिक यांच्यात तीव्र चर्चा होत असताना दिसून येते. शहराचा विकास ,मूलभूत सुविधा आणि प्रशासनातील गती यातील अपेक्षेमुळे लोकांकडून या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लोकांच्या प्रतिक्रिया वार्ड निहाय वातावरण आणि अनौपचारिक जनमत सर्वेक्षणाच्या आधारे एक तटस्थ अंदाजात्मक विश्लेषण या ठिकाणी देत आहे
जन सर्वेक्षण करण्यासाठी काही स्त्रोतांचा आधार घेतला 
   1) किनवट शहरातील दहा  प्रभागात सामान्य नागरिकांशी संवाद त्यामध्ये युवक महिला व्यावसायिक व आदिवासी समाज यांचे मत तसेच सोशल मीडियावर दिसणारा चर्चेचा कल रस्त्यावरचे जनमत जाणून घेतले.
उमेदवारांची ताकद व उनिवा
 सर्वेक्षणामध्ये दिसलेले दोन प्रमुख गट किंवा उमेदवार त्यांचे विश्लेषण 
उमेदवार एक (कमळ)
1) पूर्वी केलेले काही महत्वपूर्ण काम नागरिकांना आठवतात. 2)शहरातील मध्यवर्ती भागात चांगला संपर्क तसेच दिन दलितांना केलेली मदत 
 3)महिलांचा लाडक्या बहिणीमुळे पाठिंबा
4) ओळखीचा आपल्या जवळचा असलेला माणूस जो कधीही काम करू शकतो.
उनिवा 
1) पाच वर्ष अध्यक्ष पद केले पुन्हा नवीन व्यक्तीला संधी द्यावी 
2) काही वार्डामध्ये विरोध वाढत आहे. 
उमेदवार बी (मशाल)
ताकद 
1) तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय होत असताना दिसून येते.
2) सोशल मीडिया वरती सक्रिय उपस्थित 
3)सामान्य गरीब जनतेला पावसाळ्यात पूरग्रस्तांना केलेली मदत नाली बांधकाम.
4) नवीन उगवते नेतृत्व 
ऊनिवा 
1) प्रशासकीय अनुभव कमी असलेला.
2) सामान्य जनतेत मिसळून राहणार 
किनवट चे नागरिक कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार 
1) पाणीपुरवठा आणि जल व्यवस्थापन करणारा 
2) रस्ते गटार व ड्रेनेजची व्यवस्था करणारा 
3) किनवट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणारा 
5) आदिवासी गरीब वस्तीपर्यंत जाणारा. 
6) गरीब जनतेच्या सुखदुःखात साथ देणारा 
संभाव्य अंदाज उपलब्ध अनौपचारिक जन सर्वे मधून कोणतीही एकतर्फी लाट दिसत नाही दोन्ही उमेदवार यामध्ये काट्याची टक्कर आहे. 
काही वार्डामध्ये A हा आघाडीवर दिसत आहे तर काही भागात B चे नेटवर्क खूपच मजबूत झालेले दिसून येते. प्रत्येक वार्ड जात आपल्या ओळखीच्या  अध्यक्ष मेंबर सोबत दिसून येते..
अंतिम निकाल येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर अवलंबून राहील

मुस्लीम तेली . किनवट

किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आ...