्जन्म वर्ष
23 फेब्रुवारी 1876 ला झाला .
स्थळ
अमरावती जिल्ह्यातील शेणगाव मूर्तिजापर तालुका येथे झाला बाळ धाकट व गुबगुबीत असल्यामुळे त्यांना डेबू हे ठेवण्यात आले.
जात : भिल्ल
शिक्षण
त्यांचे शिक्षण कोणत्या शाळेत झाले नाही ते निरक्षर होते. अनुभवाच्या शिक्षणातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला.
आई वडील
झिंगरोजी व आई सखुबाई हे दांपत्य होते .झिंगरोजी यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्याकडे असलेली जमीन दौलत सावकाराने घेऊन टाकली त्यामुळे त्गाव सोडून त्यांना सखुबाई ने आपल्या मावस भावाकड कोतेगाव येथे आणले .तेथे झिंगरोजी दारूच्या व्यसनामुळे आरोग्य स्थिती बिघडत राहिली त्यात त्यांचा तरुण अंत झाला. त्यानंतर सखुबाई आपल्या भावाकडे आल्या मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरे या गावी आल्या
येथून आज दिबुजी यांना वैराग्याची दीक्षा मिळाली. मामाकडे 65 एकर शेती होती त्यावर सावकाराने आपला हक्क सांगितला आणि ती मामाकडून घेऊन टाकली पण डेबुजी यांच्या हुशारपणामुळे ती परत मामाकडे आले सर्व गावातील महार ,मांग ,चांभार , बहुजनांची सर्व मुलं डेबुजी यांच्यासोबत मिळून बसून जेवण करत.
प्रेरणा
समाज सुधारण्याची प्रेरणा हे त्यांना मुळातूनच होती तरी देखील संत तुकाराम ज्ञानेश्वर संत एकनाथ संत चोखामेळा अशा अनेक संत परंपरेतून गरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय ,अत्याचार, शोषणा विरोधातील कळकळ यातून त्यांना समाज सुधारणा प्रेरणा मिळाली.
विवाह
सोहळा यावर्षी कुंता बाईशी झाला. संसारात रमले होते त्यांना आलोका व कलावती य दोन मुली व एक गोविंद नावाचा मुलगा होता.हे पाहून आईला खूप आनंद झाला होता. आजोबा हंबीरराव हे घरचे कर्ते पुरुष होते .
संन्याशाची भेट
सन 1904 मध्ये एका संन्याशा सोबत त्यांची भेट झाली वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी म्हणजे 19 05 ला घराचा त्याग केला बारा वर्षे सतत देशभर त्यांनी भटकंती केली टाळ, मृदंग, मंडप ,तबला ,दिवाबत्तीची जनता करत होती.
वेशभूषा:
डोक्यावर फाटकी टोपी हातात फुटलेले गाडगे ,अंगात फटका चिंध्या असलेला झबला ,धोतर, हातात काठी अशा प्रकारची त्यांची वेशभूषा होती. हातात टाळ आणि मृदंग घेऊन स्वतःच किर्तन करत होते.
प्रवास:
कधी रेल्वे बस तर कधी पायी प्रचंड प्रवास त्यांनी केलेला आहे या प्रवासात प्रत्येक गावाला ते जात होते प्रथम त्या गावाची स्वच्छता स्वतःच्या हाताने करत होते त्या मोबदल्यात ते काहीही मागत नव्हते. त्यांच्या कीर्तनामुळे ग्रामीण भागातील जनता प्रभावित होऊ लागली.
कीर्तन, प्रवचन, ढोलकी ,वादन विषय
सन 1931-40 पासून खऱ्या स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन शिक्षण याबद्दल होते स्वतःच्या आवाजात कीर्तन करत त्यांचा आवाज खूप छान होता. कीर्तनाभारत देशात प्रसिद्ध झाले. मूर्ती पूजा नवस बळी प्रथा जातीभेद शिवाशिवी या प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला प्रत्येक कीर्तनातून हाच उपदेश लोकांना देत त्यामुळे लोकांनी त्यांच्या वर्तनावरून व निस्वार्थी आचरण व प्रतिकृती विचारे कर्मयोगी म्हणून त्यांच्या कार्याची मूल केले त्यांचा उपदेश रोजच्या जीवनाशी संबंधित होता त्यामुळे ध्यान मग्न होऊन आपले जीवन कर्म सुधारावे याचा विचार करील गाडगेबाबा आवर्जून सांगायचे* बापू हो दारू पिऊ नका"*
कर्ज काढून सन साजरी करू नका "
परोपकार करा गरिबावर दया करा
माय बापाला दूर करू नका
कोंबडे बकरी कापू नका असा सतत उपदेश करायचे. बाबाच्या कीर्तनामुळे लोक आत्मपरीक्षण करत होते.
वृद्धाश्रम समाजसेवेच्या अनेक संस्था
गावोगावी जाऊन "गोपाळा गोपाळा ,देवकीनंदन गोपाळा"असे कीर्तन करत होते. त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीचा वापर त्यांनी गोरगरीब दरिद्री जनतेच्या कल्याणासाठी केला त्यातून अनेक ठिकाणी समाज कल्याणकारी संस्थांची निर्मिती केली. समाजाकडून मिळालेल्या एकही पैशाचा वापर त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी केला नाही.
समाधी
20 /12 /1956 रोजी दिल्ली या ठिकाणी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी त्यांनी जगाला निरोप दिला. त्यांची समाधी वालगाव, मोझरी अमरावती जिल्ह्यातील गावी आहे.
No comments:
Post a Comment