आज राज्यघटनेला 76 वर्ष पूर्ण झाली असून हे 77 वर्ष सुरू आहे. मा गांधी यांच्या सत्य अहिंसा शांतता या तत्त्वावर आधारित आहे.
1) प्रेरणा
देशाला एक राज्यघटना असावी याबद्दल सर्वात प्रथम सुचले ते एम एन रॉय यांना यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील वसाहती अंतर्गत राज्यघटनेचा उल्लेख केला होता.
2)ब्रिटिशांचे कायदे
1773 रेग्युलेटिंग ऍक्ट 1884 ऍक्ट, 1813,1833, 1853 हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेले कायदे त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंट ने केलेले कायदे
1861 ज्यामुळे सर्व पहिले विधिमंडळाची निर्मिती झाली अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी निवडण्यात आले,
1891 1909 मुरली मिनटो सुधारणा कायदा यामुळे भारत देशात सर्वात पहिले आरक्षणाची सुरुवात झाली मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्यात आले.
1911 वर्षी भारत देशाची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणली.
1919 मॉन्टीक्यू जेम्स फोर्ड कायदा यामुळे द्विदल शासन पद्धती भारतात लागू झाली.1917 रोलेट अॅक्ट काळा कायदा ,
1927 सायमन कमिशन भारतात आले,
1927 नेहरू अहवाल मोतीलाल यांनी तयार केला . 26 जानेवारी 1930 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला.
1935 भारत सुधारणा कायदा हा कायदा भारत देशाच्या राज्यघटनेचा मूल आधार मानावयास हरकत नाही.
3) दुसरे महायुद्ध
एक सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने ओलांडल्यावर आक्रमण करून दुसऱ्या महाविद्यालय सुरुवात केली त्याच्या विरोधात 3 सप्टेंबरला इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली
4) कॅबिनेट मिशन
यामुळे भारत देशात चळवळ उभी राहिली या चळवळीला उत्तर म्हणून इंग्लंडचे लेबरपक्षा नेते पंतप्रधान क्लेमेट ऍटली भारतात कॅबिनेट कमिशन पाठविले.
5) घटना समिती निर्मिती
त्यांनी घटना समिती चे नाव सुचविले 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनच्या अहवालानंतर ब्रिटिश पार्लमेंट मान्यता दिली जुलै 1946 मध्ये कायदेमंडळाने संविधान सभा निर्माण करण्यासाठी निवडणूक झाल्या एकूण389. सदस्य निवडण्यात आले त्यामध्ये कायदेमंडळातून 292 (पैकी 212 काँग्रेस ,73 मुस्लिम लीग, सात इतर असे सदस्य) तर संस्थानिक मधून 92 व कमिशनर क्षेत्र यातून चार असे एकूण सदस्य होते
साधारणपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता प्रत्येक प्रांताचे विभाजन हे साधारण व मुस्लिम असे करण्यात आले होते.
यामध्ये एकल संक्रमण पद्धतीनुसार मतदान घेण्यात आले
तीन जून 1947 ला पाकिस्तान साठी वेगळी संविधान सभा निर्माण करण्यात आली
त्यामुळे मूळ सदस्य घटले आणि 299 संख्या राहिली .त्यामध्ये नऊ महिला होत्या.
घटना समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष
संविधान सभेची पहिली पैठण 9 डिसेंबर 1947 रोजी दिल्ली येथे भरली यामध्ये एकूण सदस्य 209 उपस्थित होते. सदस्य हा सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आली तर उपाध्यक्ष एच. सी .मुखर्जी यांनानेमण्यात आले.
11 डिसेंबर1946 रोजी घटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली .
13 डिसेंबर रोजी पंडित नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली तिला संसदेने 12 जानेवारी 1947 रोजी मान्यता दिली.
. या समितीमध्ये 22 इतर समित्या होत्या प्रत्येकाला घटना निर्मितीचे काम दिले होते या सर्वांमध्ये महत्वपूर्ण
मसुदा समिती होती
ज्याची निर्मिती 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. मसुदा समिती अंतर्गत सात सदस्य होते.
1) प्रक्रिया समिती,
2) वार्ता समिती
3),संचालन समिती,
4)कार्य समिती,
5)संविधान समिती,
6) झंडा समिती ,
6)प्रारूप समिती.
मसुदा समितीमध्ये
1) एन गोपाळ स्वामी आयंगर
2)अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
3)मोहम्मद सादुल्ला
4)के. एम .मुंशी
5)डी एन मीतरयांच्या जागी एन .माधवराव
6)डी.पी खेतान यांच्या जागी कित कृष्णामाचारी होते
.बाबासाहेब आंबेडकर यांची निवडणूक
दि राष्ट्रविभाजनापूर्वी बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांत मधील जे .सौर -खोलना या मतदारसंघातून घटना समितीवर निवडून आले होते .पण बंगाल हा अर्धा प्रांत पाकिस्तान मध्ये गेल्यामुळे आपोआपच बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्यत्व रद्द झाले त्यामुळे पेच प्रसंग निर्माण झाला.
बाबासाहेब आंबेडकर जर घटना समितीमध्ये नसतील तर भारताची राज्यघटना लिहिणे शक्य नाही याची पुरेपूर जाणीव आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व घटना समिती सल्लागार बी. एन. राव यांना होती त्यांनी
बॉम्बे प्रदेशाचे मुख्यमंत्री बी .जी.खेर यांना सांगितले त्यांनी मुंबई येथील खासदार एम. आर. जयकर यांना राजीनामा देणे सांगितले त्यामुळे बॉम्बे येथील सदस्याची जागा रिकामी करण्यात झाली आणि तेथून बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर पुन्हा निवड करण्यात आली
घटनेचे एकूण वाचन तीन झाले
राज्यघटना लिहिण्यास दोन वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला म्हणजेच १०८२ दिवस लागलेत.64 लाख रुपये एकूण खर्च लागला .
लोकशाही गणराज्य समाजवाद धर्मनिरपेक्षता मानवतावाद कल्याणकारी राज्य वसुदेव कम कुटुम्बकम विश्वशांतता अशा तत्त्वांचा सार असलेली राज्यघटना देशात लागू झालेला हा दिवस आहे..
No comments:
Post a Comment