जन्म
30 ऑगस्ट 1925 रोजी सावळी ता औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली झाला.
आई -वडील
त्यांचे वडील धोंडीबा इंगळे आई पुंजाबाई इंगळे हे एक शेतकरी कुटुंब होते. वडील उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशात गेले आणि तिकडेच स्थायिक झाले.
शिक्षण :
प्राथमिक शिक्षण सावळी येथे झाले. स्वयं अध्ययन अनुभव व्यावहारिक जीवन अन्यायाविरुद्ध प्रचंड प्रतिकार समाजात असलेल्या प्रथा त्याबाबत असलेले ज्ञान साधना यातून स्वयं पेरणीने शिक्षण झाले.
प्रेरणा
समाजात असलेले प्रचंड दारिद्र्य त्याचे कारण त्यामुळे शोषित समाजाला त्यातून बाहेर काढण्याची उत्स्फूर्त प्रेरणा त्यांना ध्यान धारणीतून मिळालेली आहे.
कार्य
कोणत्याही एका जाती पुरते किंवा धर्मापुरते मर्यादित स्वरूपाचे त्यांचे कोणतेही काम नव्हते. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत तसेच कच्छ ते अरुणाचल प्रदेशातील सिलचर पर्यंत त्यांचे कार्य पसरलेले होते.
ध्यानधारणा केंद्र उभारणी
250 चावर ध्यानधारणा केंद्रांची स्थापना मराठवाडा विदर्भ आंध्र प्रदेश तेलंगणा या परिसरात झालेली आहे. विदेशातून देखील यात्री भक्त तेलंगणा मधील पटनापूर मंडळ जैनुर ता उटनूरजि. आदिलाबाद येथे दर्शननासठी येतात.
संपूर्ण देशात त्यांच्या यात्रा
1)सन2008 नांदेड येथे झालेल्या शीख धर्माच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने गुरुजी कार्यक्रमांमध्ये त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
2)सन 2012 मध्ये कश्मीर मधील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्ये मानव जातीच्या कल्याणा बाबत त्यांनी उपदेश दिला होता.
3)सन 2013 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरास त्यांनी 200 अनुयायासह भेट दिली.
शिकवण
"मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" याप्रमाणे संत फुलाजी बाबा यांनी दुःखी व पिढीत जनतेचे दुःख दूर करण्याचा मार्ग दाखविला.
1) विश्वामध्ये आपण आहोत आपल्यामध्ये विश्व आहे तोच ईश्वर आहे.
2 )प्रत्येक व्यक्तीने धनासाठी नाही तर जनासाठी कार्य करावे.
3) साधी राहणी उच्च विचारसरणी ठेवावे.
4) जातिभेद व धर्म भेद करू नाही.
5 )ध्यानधारणा हे अंतिम सत्य आहे
6 )स्वच्छ मनाने व उदात हेतूने जनमानसाची दुःख दूर करावे.
समाधी
आंध्र तेलंगणात असलेल्या उठनुर येथे त्यांची समाधी आहे.
No comments:
Post a Comment