जे नागोराव हे व्यक्तिमत्व समाजाच्या शिक्षण मुलांच्या व्यक्तिमत्व विकास सामाजिक न्याय आणि राजकीय जागृती तसेच शहराच्या दळणवळण विकासासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी निरंतर संघर्ष केला जो आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांनी केलेले कार्य किनवट परिसरातील समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहे शिक्षणाचा जीप सामाजिक समता स्वाभिमान या मूल्यांचा प्रसाद त्यांनी अखंडपणे केलेला आहे
त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आपण त्यांचे आयुष्य कार्य आणि संघर्ष पुनश्च स्मरण तो आणि नव्या पिढीला यामुळे प्रेरणा मिळतात.
जन्म
सन 10 सप्टेंबर 1938 रोजी त्यांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे जन्म नाव दामोदर होते.
कुटुंब
वडील किष्टना हे पटवारी होते तर आई हे परिवाराचा सांभाळ करणारी प्रेमळ घरगुती महिला होती. त्यांच्या कुटुंबात तीन बहिणी व एकुलता एक मोठा भाऊ जे नागोराव होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे नोकरी साठी बाहेर पाठविणे म्हणजे काळजावर दगड ठेवण्यासारखे होते त्यामुळे त्यांचा बाहेर नोकरीच विरोध होता.
शिक्षण.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हे आदीलाबाद येथील शाळेत झाले त्यानंतर पदवीचे शिक्षण त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी घेतले त्यांचे स्वप्न पी.एस.आय. बनवण्याचे होते. त्यासाठी जबलपूर येथे प्रशिक्षण करण्यासाठी गेले .
मुलाने समाज कार्य करावे अशी त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा होती.
किनवट नगरपालिका मुख्याधिकारी
सन 1966 च्या नगरपालिका कायद्यामुळे किनवट नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याचे पद निर्माण झाले .त्या पदासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्याकरिता त्यांना नऊ महिन्याच्या ट्रेनिंग साठी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे किनवट नगरपरिषदेचे प्रथम प्रशासकीय मुख्याधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
अल्पावधीतच श्री उत्तमरावजी राठोड यांचे विश्वास पात्र मित्र बनले दोघांचा साथ हा विकासाचा हात बनला. किनवट परिसरातील मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता त्यांनी शैक्षणिक संकुलांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळीराम पाटील महाविद्यालय किनवट हे 1972 रोजी चालू केले ते पहिले सचिव बनले
संपूर्ण महाविद्यालयाची धुरा ही त्यांच्यावरच होती त्यांच्या कालखंडात महाविद्यालयाचा विकास करण्यात आला
त्यांच्या कार्यामुळे किनवट शहरांमध्ये सुव्यवस्था निर्माण झाली त्यांची कर्तुत्वाची शैली जबाबदार होती त्यामुळे आज किनवट शहरांमध्ये चौकातील रस्त्यांची रुंदी ही मोठी दिसून येते
किनवट नगराचा विकास करण्यावर त्यांचा पूर्ण भर होता
सन 1966 अधिनियमाद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हे सत्र चालू असताना त्यांची देखील बदली झाली पण ती नंतर रद्द करण्यात आली कारण त्यांची विकासाचा प्रभाव तसा होता
किनवट परिसरातील शेतकऱ्यांना
कापूस एकाधिकार खरेदी योजना यानुसार कापसाची विक्री महाराष्ट्र येथेच करावी लागत होती पण ही खरेदी योग्य वेळेवर होत नव्हती तसेच कापसाला योग्य भाव सुद्धा मिळत नव्हता .त्यामुळे किनवट येथील शेतकरी आपले कापूस विक्री करण्यासाठी आंध्रामध्ये जात होते परंतु तेथे जाण्यासाठी महाराष्ट्र आंध्र सीमेवरील नागरिकाकडून अनेक समस्या निर्माण होत असे
याबद्दल डी वाय एस पी शृंगार बेल यांना जे नागोराव यांनी त्याबाबत आवेदन दिले.
जनतेला न्याय मिळावा यासाठी जे नागोरव यांनी किनवट तहसील समोर मोठे भाषण दिले.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झाला होता.
संपूर्ण किनवट शहर याप्रसंगी घोषणा नारे मोठ्या प्रमाणात देण्यात आले होते न्याय हक्क मिळावा यासाठी किनवटच्या नागरिकांचे हे आंदोलन होते
त्यास जे नागोराव यांचे नेतृत्व मिळाले होते अत्यंत तल्लख बुद्धीमान व्यक्तिमत्व त्यांचे होते आंदोलनात संपूर्ण तरुण वर्गाचा समावेश व शेतकरी सहभागी होते
श्री शृंगारवेल हे प्रशासकीय अधिकारी नागपूर या ठिकाणी कार्यरत होते किनवटची परिस्थिती पाहून त्यांना या ठिकाणी पाठविण्यात आले
यावेळेस त्यांच्या संरक्षणासाठी किनवटचे पीएसआय तसेच अनेक कॉन्स्टेबल तैनात होते
हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीचे हे दिवस होते 28 नोव्हेंबर1978 रात्री
साडेसात वाजताची ही वेळ होती.डी. वाय. एस. पी .शृंगारवेल हे आराम करण्यासाठी विश्रामगृहात गेले होते हे ठिकाण जुन्या नगरपालिका ठिकाणाच्या मागील बाजूस फॉरेस्ट ऑफिस जवळ होते रात्रीचा अंधार किट आणि झाडाझुडपांचा परिसर होता त्यांनी विश्रांती करते वेळेस भेटण्यास कोणालाही परवानगी देण्यास मनाई केली पण किनवट परिसरातील हा लढा तीव्र झाला होता.
न्याय मिळाल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या होत्या त्यामुळे शृंगार वेल यांना भेटण्यासाठी जे नागोराव गेले पण त्यांचे भेटणे झाले नाही. दुसरीकडे कडाक्याची थंडी असल्यामुळे कापसाच्या ढिगार्याजवळ शेकोटी करून अनेक व्यक्ती बसले होते
र. पुढे या शेकोटीचे रूपांतरण मोठ्या आगीत झाले विषमगृहाकडे जाण्यासाठी एकच मार्ग होता तो देखील किर अंधाराचा आणि झाडाझुडपांचा होता.
हे आंदोलन शमविण्यासाठी सुरुवातीला सौम्य लाठी चार्ज चा आदेश दिला
त्यामुळे नगरपालिका परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यावेळेस नगरपालिका श्री मधुकर वट्टमवार हे अध्यक्ष होते सर्वत्र धावपळ सुरू झाली एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले
अशा परिस्थितीतच अचानक गोळीबार देखील चालू झाला या गोळीबारामध्ये तिघांना गोळ्या लागल्या.
त्यामध्ये बाबूलल भंडारेव हा ट्रॅक्टर वाहक
यांना प्रथम गोळी लागली दुसरी गोळी सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलगा म्हणजे साबीर खैरूदिनखान यांच्या कमरीला बंदुकीचीगोळी लागली ते रक्तबंबाळ झाले होते त्यांना वाचविण्यास हा प्रयत्न जे नागोराव यांनी केला पण हे कार्य करताना दरवाज्याच्या फटी मधून डायरेक्ट त्यांच्या हृदयात गोळी लागली त्यामुळे ते जागीच धारातीर्थी पडले.
नागोराव यांचे कार्य आणि क्षेत्रांमध्ये ठळकपणे दिसून येते
1) व्यक्तिमत्व शिक्षण आणि स्वाभिमान जागृती,
2) किनवट परिसरातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे 3)शिक्षण हे केवळ रोजगार निर्मितीसाठी साधन त्यांनी मांडली नाही तर जीवन जगण्याची साधन मानले
4) समाजातील अन्याय कर्ज जात मध्ये सवन भेदभाव अंधश्रद्धा
5) किनवट परिसरात असलेल्या आदिवासी गावांमध्ये समता सहकार्य स्वच्छता व आरोग्य यांचा त्यांनी नेहमी संदेश पोहोचविला
6) या परिसरातील आन गोंड कोलाम प्रधान आंध्रा बंजारा वेलमा समाजातील 17 पगड जाती मध्ये असलेल्या पारंपारिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड त्यांनी देण्याचा प्रयत्न केला.
7) किनवट परिसरात तील नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता व हक्क चळवळ त्यांनी निर्माण केल्या लोकशाहीमध्ये जागरूक मतदार नेतृत्व आणि अधिकाराची मागणी कशी करावी हे त्यांनी शिकविले गावाच्या विकास आराखड्यात लोकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला
जे नागोराव यांनी समाज हिताच्या दृष्टीने जीवन समर्पित केले आणि त्यांचे बलिदान हे किनवट इतिहासातील प्रेरणेचे स्मारक आहे.
No comments:
Post a Comment