स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम येथे सन 1952 मध्ये पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या या निवडणुका तीन वर्षाकरिता होत्या . निजामाचे प्रशासक म्हणून खानदेशातून आलेले सरदार शाहमदार खान दुर्रानी यांची निवड झाली
1) त्यानंतर सन 1956 ला हैदराबाद मुन्सिपल लागू करण्यात आला त्यानुसार सलग किनवट नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून 1961 पर्यंत कार्यरत राहिले.
2) त्यानंतर श्री. एस .नर्सिंमलु सुकरवार सन 1962 ते 1964 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर सन 1964 ते 67 मध्ये श्री टी गोविंदराव तिरमनवार यांनी अध्यक्ष म्हणून कार्य केले.
महाराष्ट्र राज्याचा सर्वप्रथम नगरपालिका स्थानिक प्रशासनासाठी कायदा झाला तो सन 1965 मध्ये त्यानुसार किनवट पूरपालीकाही नगरपालिकेमध्ये परिवर्तित झाली. त्यानुसार प्रथमच या कायद्यानुसार निवडणुका झाल्या त्यामध्ये 1)श्री मलया मॅकलवार सन 1967 ते 1972
उपाध्यक्ष म्हणून मा खैरुद्दीन खान यांनी कार्य केले .
2)श्री .किशनराव इटकेपेल्लीवार 1973- 74
3)श्री मधुकरराव वट्टमवार 1975 -1979
(ते पहिले जनतेमधून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते.) 4)लक्ष्मणराव रागोलू नेमानेवार सन 1984
5)गोपाळराव नारायणराव नेम्मानिवार सण 1986
6)इसा खान सरदार खान 1991
7)निसार खान 1992
8)जगदीश मेनन 1997
9) दीपक नेमानिवार 1998
10). दिनकर बाबुराव चाडावार 1999
11) व्यंकटराव मुकुंदराव नेमानीवार 2000
12) इसाखान सरदार खान 2000 (जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले होते.)
13)अरुण लक्ष्मण आळणे 2005
14)मूर्ती यलप्पा कलगोटवार 2010
15)केवल कुमार नेमानेवार 2012
16)सुनील किशनराव पाटील 2014
17) सौ.इंदुताई शत्रुघन कनाके(2016)
( पहिल्या महिला अध्यक्षा )
18) साजिद खान निसार खान 2019
19)आनंद मच्छीवार 2019 ते 20 23
किनवट नगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत एकूण 22 वार्ड आहेत. सुरुवातीस केवळ विठ्ठल मंदिर परिसर ,वेलमापुराव, राम मंदिराचा परिसर हेच वॉर्ड होत
2025 च नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण दहा प्रभाग आहेत त्यामध्ये 21 सदस्य निवडण्यात येणार आहेत. किनवट ची एकूण मतदार संख्या ही 25593 आहे त्यामध्ये पुरुष 12334 आहेत तर महिला 13256 आहेत. बहुमत लाडकी बहिणीकडे आहे.02/12/2025 मतदान आहे सर्व मतदारांनी जागृत राहून आपल्या किनवट शहराचा विकास करावा यासाठी विचारपूर्वक मतदान करावे आणि नगराध्यक्षपदा वर जिम्मेदार कर्तबगार उमेदवाराची निवड करावी.
No comments:
Post a Comment