Friday, 5 December 2025

किनवट रेल्वे ऐतिहासिक विकास समस्या अणि उपाय:-प्रा.सतोष गोपीचंद पवार

सन 1947 वर्षी किनवट रेल्वेची सुरुवात झाली हा मार्ग तयार झाला या मार्गाचे काम 1932 पासून सुरू झाले होते.सन1967 ला किनवट स्टेशनची निर्मिती झाली पूर्वी जंगलामध्ये हे स्टेशन मोकळी जागा होती.सन2005 ला किनवट रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये या रेल्वे मार्ग ची उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री श्री लालूप्रसाद यादव हे किनवट येथे आले होते.
      ब्रॉडगे झाल्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढ झाली कृष्णा एक्सप्रेस ही तिरुपतीला तर नंदिग्राम ही मुंबईला ,अकोला पॅसेंजर,,सत्रागाछी यागाडया सोडण्यात आल्या पण पुरेशा नाहीत.
      प्रवासी वेळेवर गेले तर मोठ्या शहरातील कामे होतील..अथिक गाड्या सोडण्यातची गरज आहे.
        महीला सुरक्षा होन गरजेचे आहे..
व्यापारासाठी गोदामांची निर्मिती करणे गरजेचे आहे 
तसेच स्वच्छता , प्रवासी मुक्कामाची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे
.       पिण्याचे शुद्ध पाणी रेल्वे पोलीस करणे ची अधिक व्यवस्था दळणवळणाची अधिक व्यवस्था रेल्वे पोस्ट निर्माण करणे 
         रात्री वेळेस एलईडी बल्ब जागोजागी लावणे  रेल्वे तकिटांची सुविधा करणे जनतेसाठी रोजगार निर्माण करणे स्थानिक जनप्रतिनिधी आणि नानागरिकांशी मिळून रेल्वेने सार्वजनिक कामे करावी आजच्या किनवट ची गरज आहे..

Saturday, 29 November 2025

माऊली मुंगसाजी महाराजांचे जीवन: एक प्रेरणादायी शिकवण प्रा संतोष गोपीचंद पवार

भगवान मुंगसाजी महाराज विदर्भाच्या मातीत जन्मलेले एक चमत्कारिक व समाजसुधारक संत होते. त्यांचे जीवन अध्यात्म समाजसेवा परोपकार यामध्ये गेलेले आहे.. साधेपणा ,भक्ती सत्य निष्ष्टवान लोकांच्या दु:खानात स्पर्श करूनमानसिक आणि भावनिक त्यांचा आधार बनत होते.  त्यांच्या प्रवचनातून  श्रद्धा सकारात्मकता व संयम  यांचा प्रभावी संदेश मिळतो.  
           महाराज यांचा जन्म 5 सप्टेंबर 1863 रोजी शुक्रवार या दिवशी आंध कुळा मध्ये झाला.धामणगाव हे   दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ  मध्ये आहे..
             वडिलांचे नाव विक्रम व आईचे नाव गमाई असे होते. आजोबाचे नाव भोपाजी व आजीचे नाव साखराबाई होते. मुंगसाजी माऊली यांचे घराणे आजोबाच्या काळापासूनच श्रीमंत होते ते सर्व समाजातील कर्ज व गरीब माणसांना नेहमी मदत करत अन्नदान हे तर त्या घराण्याचे आवडते कार्य होत                  हीच परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली होती. अशातच या कुटुंबाला गरिबीचे दिवस केव्हा आले पत्ताही लागला नाही त्यामुळे मुंगसाजी महाराजांना गावातील व आपसातील काही व्यक्तीने त्रास देण्यास सुरुवात केली.
           परंपरेने मुंगसाजी महाराजांकडे गावचीपाटीलकी आली होती पण काही व्यक्तींनी त्यास विरोध केला. 
           अशा परिस्थितीमध्ये मुंगसाजी महाराज यांनी आपल्या मालकीच्या गढी मध्ये बारा वर्षे एकाच ठिकाणी तपस्या केली            विसाव्या वर्षीपासून बारा वर्षे सलग त्यांनी तप केले. तपामुळे मांडी व पोटरी एकच झाली होती 
         तप पूर्ण झाल्यानंतर तपासून उठल्यावर माऊलीच्या मांडीतून खूप रक्त वाहिले धामणगाव मध्ये तपा नंतरही समाजकंटक लोकांनी त्रास दिला होता.
             भुकेले असलेल्या जनतेला अन्नदान करणे
             कित्येक शेतकरी मजूर सामान्य नागरिक कर्जामध्ये डुबलेले असतात त्यांना कर्जमुक्त केले
             कित्येकांची लग्न जुळत नव्हते त्यांचे लग्न देखील लावून दिले .
              हजारो भक्तांना त्यांनी संकल्प सिद्धीने दुःखमुक्त केले त्यामुळे त्यांना महात्मा देखील म्हणण्यात आले
           त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती त्यामुळे त्यांना अनेक विद्वान लोक देखील भेटण्यास येत होते 
             अवतार मेहेर बाबा असेच एक संत होते त्यांनी देखील .
               1940 ते 45 या दरम्यान भेटतही दिल्या तसेच बडोद्याचे राजे यशवंतराव घाडगे हे त्यांनी सन 194119 47 पर्यंत सलग सहा वर्ष महाराजांची सेवा केली.
                  09.021947 मध्ये भगवान मुंगसाजी माऊली यांनी यशवंत घाडगे यांना बोलाविले व त्यांच्या समवेत शेगाव मूर्तिजापूर अकोला खामगाव नाशिक व मुंबादेवी च्या यात्रेमध्ये घेऊन जाण्यास सांगितले .
                  भगवान मुंगसाजी माऊली सन 1947 व 1952 पर्यंत 11 वर्ष मुंबईला एका जागी राहिले होते.
                     माऊली एकदा मुंबईला गेल्यानंतर परत धामणगावला आले नाही त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या हजारो भक्तांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली.
                   मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची ही माऊलींच्या नातेवाईकांनी भेट घेतली  परंतु तरीही मुंगसाजी माऊलींची भेट झाली नाही.
                 मुंगसाजी महाराजांच्या नातेवाईकावर व त्यांच्या भक्तावर पोलीस केस करण्यात आली.
                 ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध राजकीय स्वातंत्र्याचा लढा चालू होता तर दुसरीकडे मुंगसाजी महाराज सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक व राजकीय असा मानवाच्या सर्व सामाजिक बंधनात अडकलेल्या मानवास त्यातल्या त्यात सर्वात जास्त बळी पडलेल्या बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे महान कार्य केले होते.
                     

Friday, 28 November 2025

2025 किनवट नगराध्यक्षपदी कोण निवडून येणार जाणूया जन्मताचा कल-राजकीय विश्लेषक प्रा संतोष गोपीचंद पवार

2025 च्या किनवट नगरपरिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ वाढलेले आहे नागरिक सामाजिक संघटना युवक आणि व्यावसायिक यांच्यात तीव्र चर्चा होत असताना दिसून येते. शहराचा विकास ,मूलभूत सुविधा आणि प्रशासनातील गती यातील अपेक्षेमुळे लोकांकडून या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. लोकांच्या प्रतिक्रिया वार्ड निहाय वातावरण आणि अनौपचारिक जनमत सर्वेक्षणाच्या आधारे एक तटस्थ अंदाजात्मक विश्लेषण या ठिकाणी देत आहे
जन सर्वेक्षण करण्यासाठी काही स्त्रोतांचा आधार घेतला 
   1) किनवट शहरातील दहा  प्रभागात सामान्य नागरिकांशी संवाद त्यामध्ये युवक महिला व्यावसायिक व आदिवासी समाज यांचे मत तसेच सोशल मीडियावर दिसणारा चर्चेचा कल रस्त्यावरचे जनमत जाणून घेतले.
उमेदवारांची ताकद व उनिवा
 सर्वेक्षणामध्ये दिसलेले दोन प्रमुख गट किंवा उमेदवार त्यांचे विश्लेषण 
उमेदवार एक (कमळ)
1) पूर्वी केलेले काही महत्वपूर्ण काम नागरिकांना आठवतात. 2)शहरातील मध्यवर्ती भागात चांगला संपर्क तसेच दिन दलितांना केलेली मदत 
 3)महिलांचा लाडक्या बहिणीमुळे पाठिंबा
4) ओळखीचा आपल्या जवळचा असलेला माणूस जो कधीही काम करू शकतो.
उनिवा 
1) पाच वर्ष अध्यक्ष पद केले पुन्हा नवीन व्यक्तीला संधी द्यावी 
2) काही वार्डामध्ये विरोध वाढत आहे. 
उमेदवार बी (मशाल)
ताकद 
1) तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय होत असताना दिसून येते.
2) सोशल मीडिया वरती सक्रिय उपस्थित 
3)सामान्य गरीब जनतेला पावसाळ्यात पूरग्रस्तांना केलेली मदत नाली बांधकाम.
4) नवीन उगवते नेतृत्व 
ऊनिवा 
1) प्रशासकीय अनुभव कमी असलेला.
2) सामान्य जनतेत मिसळून राहणार 
किनवट चे नागरिक कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार 
1) पाणीपुरवठा आणि जल व्यवस्थापन करणारा 
2) रस्ते गटार व ड्रेनेजची व्यवस्था करणारा 
3) किनवट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणारा 
5) आदिवासी गरीब वस्तीपर्यंत जाणारा. 
6) गरीब जनतेच्या सुखदुःखात साथ देणारा 
संभाव्य अंदाज उपलब्ध अनौपचारिक जन सर्वे मधून कोणतीही एकतर्फी लाट दिसत नाही दोन्ही उमेदवार यामध्ये काट्याची टक्कर आहे
काही वार्डामध्ये A हा आघाडीवर दिसत आहे तर काही भागात B चे नेटवर्क खूपच मजबूत झालेले दिसून येते. प्रत्येक वार्ड जात आपल्या ओळखीच्या  अध्यक्ष मेंबर सोबत दिसून येते..
अंतिम निकाल येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर अवलंबून राहील

Wednesday, 26 November 2025

महात्मा जे .नागोराव प्रा. संतोष गोपीचंद पवार

किनवट हे निसर्गांनी नटलेले विविध आदिवासी संस्कृतीने भरलेले ठिकाण आहे या मातृभूमी मध्ये अनेक विविध समाज सुधारक कार्यकर्ते लढवय्ये उद्यास आले 
          जे नागोराव हे व्यक्तिमत्व समाजाच्या शिक्षण मुलांच्या व्यक्तिमत्व विकास सामाजिक न्याय आणि राजकीय जागृती तसेच शहराच्या दळणवळण विकासासाठी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी निरंतर संघर्ष केला जो आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. 
          त्यांनी केलेले कार्य किनवट परिसरातील समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहे शिक्षणाचा जीप सामाजिक समता स्वाभिमान या मूल्यांचा प्रसाद त्यांनी अखंडपणे केलेला आहे 
           त्यांच्या बलिदान दिवसानिमित्त आपण त्यांचे आयुष्य कार्य आणि संघर्ष पुनश्च स्मरण तो आणि नव्या पिढीला यामुळे प्रेरणा मिळतात. 
   जन्म 
       सन 10 सप्टेंबर 1938 रोजी त्यांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे जन्म नाव दामोदर होते.
कुटुंब
      वडील किष्टना हे पटवारी होते तर आई हे परिवाराचा सांभाळ करणारी प्रेमळ घरगुती महिला होती. त्यांच्या कुटुंबात तीन बहिणी व एकुलता एक मोठा भाऊ जे नागोराव होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे नोकरी साठी बाहेर पाठविणे म्हणजे काळजावर दगड ठेवण्यासारखे होते त्यामुळे त्यांचा बाहेर नोकरीच विरोध होता. 
शिक्षण. 
        त्यांचे प्राथमिक  शिक्षण हे आदीलाबाद येथील शाळेत झाले त्यानंतर पदवीचे शिक्षण त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी घेतले त्यांचे स्वप्न पी.एस.आय. बनवण्याचे होते. त्यासाठी जबलपूर येथे प्रशिक्षण  करण्यासाठी गेले .
        मुलाने समाज कार्य करावे अशी त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. 
किनवट नगरपालिका मुख्याधिकारी
                 सन 1966 च्या नगरपालिका कायद्यामुळे किनवट नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याचे पद निर्माण झाले .त्या पदासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्याकरिता त्यांना नऊ महिन्याच्या ट्रेनिंग साठी दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे किनवट नगरपरिषदेचे प्रथम प्रशासकीय मुख्याधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
                      अल्पावधीतच श्री उत्तमरावजी राठोड यांचे विश्वास पात्र मित्र बनले दोघांचा साथ हा विकासाचा हात बनला. किनवट परिसरातील मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता त्यांनी शैक्षणिक संकुलांची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळीराम पाटील महाविद्यालय किनवट हे 1972 रोजी चालू केले ते पहिले सचिव बनले
                  संपूर्ण महाविद्यालयाची धुरा ही त्यांच्यावरच होती त्यांच्या कालखंडात महाविद्यालयाचा विकास करण्यात आला 
                  त्यांच्या कार्यामुळे किनवट शहरांमध्ये सुव्यवस्था निर्माण झाली त्यांची कर्तुत्वाची शैली जबाबदार होती त्यामुळे                  आज किनवट शहरांमध्ये चौकातील रस्त्यांची रुंदी ही मोठी दिसून येते
                  किनवट नगराचा विकास करण्यावर त्यांचा पूर्ण भर होता 
                     सन 1966 अधिनियमाद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हे सत्र चालू असताना त्यांची देखील बदली झाली पण ती नंतर रद्द करण्यात आली कारण त्यांची विकासाचा प्रभाव तसा होता 
          किनवट परिसरातील शेतकऱ्यांना
            कापूस  एकाधिकार खरेदी योजना यानुसार कापसाची विक्री महाराष्ट्र येथेच करावी लागत होती पण ही खरेदी योग्य वेळेवर होत नव्हती तसेच कापसाला योग्य भाव सुद्धा मिळत नव्हता .त्यामुळे किनवट येथील शेतकरी आपले कापूस विक्री करण्यासाठी आंध्रामध्ये जात होते परंतु तेथे जाण्यासाठी महाराष्ट्र आंध्र सीमेवरील नागरिकाकडून अनेक समस्या निर्माण होत असे 
          याबद्दल डी वाय एस पी शृंगार बेल यांना जे नागोराव यांनी त्याबाबत आवेदन दिले. 
जनतेला न्याय मिळावा यासाठी जे नागोरव यांनी किनवट तहसील समोर मोठे भाषण दिले.
 या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित झाला होता.
           संपूर्ण किनवट शहर याप्रसंगी घोषणा नारे मोठ्या प्रमाणात देण्यात आले होते न्याय हक्क मिळावा यासाठी किनवटच्या नागरिकांचे हे आंदोलन होते 
            त्यास जे नागोराव यांचे नेतृत्व मिळाले होते अत्यंत तल्लख बुद्धीमान व्यक्तिमत्व त्यांचे होते आंदोलनात संपूर्ण तरुण वर्गाचा समावेश व शेतकरी सहभागी होते 
              श्री शृंगारवेल हे प्रशासकीय अधिकारी नागपूर या ठिकाणी कार्यरत होते किनवटची परिस्थिती पाहून त्यांना या ठिकाणी पाठविण्यात आले 
             यावेळेस त्यांच्या संरक्षणासाठी किनवटचे पीएसआय तसेच अनेक कॉन्स्टेबल तैनात होते 
               हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीचे हे दिवस होते 28 नोव्हेंबर1978 रात्री 
                साडेसात वाजताची ही वेळ होती.डी. वाय. एस. पी .शृंगारवेल हे आराम करण्यासाठी विश्रामगृहात गेले होते हे ठिकाण जुन्या नगरपालिका ठिकाणाच्या मागील बाजूस फॉरेस्ट ऑफिस जवळ होते रात्रीचा अंधार किट आणि झाडाझुडपांचा परिसर होता त्यांनी विश्रांती करते वेळेस भेटण्यास कोणालाही परवानगी देण्यास मनाई केली पण किनवट परिसरातील हा लढा तीव्र झाला होता.
             न्याय मिळाल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या होत्या त्यामुळे शृंगार वेल यांना भेटण्यासाठी जे नागोराव गेले पण त्यांचे भेटणे झाले नाही. दुसरीकडे कडाक्याची थंडी असल्यामुळे कापसाच्या ढिगार्‍याजवळ शेकोटी करून अनेक व्यक्ती बसले होते
                र. पुढे या शेकोटीचे रूपांतरण मोठ्या आगीत झाले विषमगृहाकडे जाण्यासाठी एकच मार्ग होता तो देखील किर अंधाराचा आणि झाडाझुडपांचा होता. 
   हे आंदोलन शमविण्यासाठी सुरुवातीला सौम्य लाठी चार्ज चा आदेश दिला 
              त्यामुळे नगरपालिका परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले यावेळेस नगरपालिका श्री मधुकर वट्टमवार हे अध्यक्ष होते सर्वत्र धावपळ सुरू झाली एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले 
          अशा परिस्थितीतच अचानक गोळीबार देखील चालू झाला या गोळीबारामध्ये तिघांना गोळ्या लागल्या.
           त्यामध्ये बाबूलल भंडारेव हा ट्रॅक्टर वाहक
             यांना प्रथम गोळी लागली दुसरी गोळी सातव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलगा म्हणजे साबीर खैरूदिनखान यांच्या कमरीला बंदुकीचीगोळी लागली ते रक्तबंबाळ झाले होते त्यांना वाचविण्यास हा प्रयत्न जे नागोराव यांनी केला पण हे कार्य करताना दरवाज्याच्या फटी मधून डायरेक्ट त्यांच्या हृदयात गोळी लागली त्यामुळे ते जागीच धारातीर्थी पडले.
      नागोराव यांचे कार्य आणि क्षेत्रांमध्ये ठळकपणे दिसून येते 
1) व्यक्तिमत्व शिक्षण आणि स्वाभिमान जागृती,
2) किनवट परिसरातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे  व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे 3)शिक्षण हे केवळ रोजगार निर्मितीसाठी साधन त्यांनी मांडली नाही तर जीवन जगण्याची साधन मानले
 4)  समाजातील अन्याय कर्ज जात मध्ये सवन भेदभाव अंधश्रद्धा
5) किनवट परिसरात असलेल्या आदिवासी गावांमध्ये समता सहकार्य स्वच्छता व आरोग्य यांचा त्यांनी नेहमी संदेश पोहोचविला
 6) या परिसरातील आन गोंड कोलाम प्रधान आंध्रा बंजारा वेलमा समाजातील 17 पगड जाती मध्ये असलेल्या पारंपारिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. 
7) किनवट परिसरात तील नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता व हक्क चळवळ त्यांनी निर्माण केल्या लोकशाहीमध्ये जागरूक मतदार नेतृत्व आणि अधिकाराची मागणी कशी करावी हे त्यांनी शिकविले गावाच्या विकास आराखड्यात लोकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला 
जे नागोराव यांनी समाज हिताच्या दृष्टीने जीवन समर्पित केले आणि त्यांचे बलिदान हे किनवट इतिहासातील प्रेरणेचे स्मारक आहे.

हुतात्मा जे नागोराव प्रा संतोष गोपीचंद

किनवट हे निसर्ग संपन्न विविध आदिवासी संस्कृतींनी नटलेले आहे. अशा या भूमीत विविध समाज सुधारक राजकीय नेतृत्व उदयास आलेले आहेत त्यामध्ये नागोराव हे व्यक्तिमत्व एक आहे त्यांनी या परिसरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक न्याय व्यक्तिमत्व विकास व्यापार दळणवळण प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रंत विकास व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे आणि त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा घेण्यासारखे आहे
त्यांनी केलेले कार्य किनवट परिसरातील समाजाला अंधाराकडून उजेड्याकडे नेणारे आहे. शिक्षणाचा दीप, सामाजिक समता आणि स्वाभिमान या मूल्यांचा प्रसार त्यांनी आयुष्यभर केला. 

भारत देशाची राज्यघटना- प्रा. संतोष गोपीचंद पवार

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाची राज्यघटनेचे काही कलमे लागू झाली त्यावर 384 सदस्यांनी सह्या केल्या होत्या.
 आज राज्यघटनेला 76 वर्ष पूर्ण झाली असून हे 77 वर्ष सुरू आहे. मा गांधी यांच्या सत्य अहिंसा शांतता या तत्त्वावर आधारित आहे.
1)   प्रेरणा
     देशाला एक राज्यघटना असावी याबद्दल सर्वात प्रथम सुचले ते एम एन रॉय यांना यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील वसाहती अंतर्गत राज्यघटनेचा उल्लेख केला होता. 
2)ब्रिटिशांचे कायदे 
       1773 रेग्युलेटिंग ऍक्ट 1884  ऍक्ट, 1813,1833,  1853 हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेले कायदे त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंट ने केलेले कायदे 
       1861 ज्यामुळे सर्व पहिले विधिमंडळाची निर्मिती झाली अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी निवडण्यात आले,
       1891 1909 मुरली मिनटो सुधारणा कायदा यामुळे भारत देशात सर्वात पहिले आरक्षणाची सुरुवात झाली मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देण्यात आले.
       1911 वर्षी भारत देशाची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणली. 
         1919 मॉन्टीक्यू जेम्स फोर्ड कायदा यामुळे द्विदल शासन पद्धती भारतात लागू झाली.1917 रोलेट अॅक्ट काळा कायदा ,
          1927 सायमन कमिशन भारतात आले,
           1927 नेहरू अहवाल मोतीलाल यांनी तयार केला .              26 जानेवारी 1930 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला.
             1935 भारत सुधारणा कायदा हा कायदा भारत देशाच्या राज्यघटनेचा मूल आधार मानावयास हरकत नाही. 
3)    दुसरे महायुद्ध       
                 एक सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने ओलांडल्यावर आक्रमण करून दुसऱ्या महाविद्यालय सुरुवात केली त्याच्या विरोधात 3 सप्टेंबरला इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा केली 
 4)   कॅबिनेट मिशन      
          ‌‌   यामुळे भारत देशात चळवळ उभी राहिली या चळवळीला उत्तर म्हणून इंग्लंडचे लेबरपक्षा नेते पंतप्रधान क्लेमेट ऍटली  भारतात कॅबिनेट कमिशन पाठविले.
5) घटना समिती निर्मिती 
         त्यांनी घटना समिती चे नाव सुचविले 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनच्या अहवालानंतर ब्रिटिश पार्लमेंट मान्यता दिली जुलै 1946 मध्ये  कायदेमंडळाने संविधान सभा निर्माण करण्यासाठी निवडणूक झाल्या एकूण389. सदस्य निवडण्यात आले त्यामध्ये कायदेमंडळातून  292 (पैकी 212 काँग्रेस ,73 मुस्लिम लीग, सात इतर असे सदस्य)  तर संस्थानिक मधून 92 व कमिशनर क्षेत्र यातून चार असे एकूण सदस्य होते
            साधारणपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य होता  प्रत्येक प्रांताचे विभाजन हे साधारण  व मुस्लिम  असे करण्यात आले होते.
             यामध्ये एकल संक्रमण पद्धतीनुसार मतदान घेण्यात आले 
        तीन जून 1947 ला पाकिस्तान साठी वेगळी संविधान सभा निर्माण करण्यात आली 
          त्यामुळे मूळ सदस्य घटले आणि  299 संख्या राहिली .त्यामध्ये नऊ महिला होत्या.
घटना समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष
         संविधान सभेची पहिली पैठण 9 डिसेंबर 1947 रोजी दिल्ली येथे भरली यामध्ये एकूण सदस्य 209  उपस्थित होते. सदस्य हा सच्चिदानंद सिन्हा यांना  अध्यक्ष म्हणून निवडण्यात आली तर उपाध्यक्ष एच. सी .मुखर्जी यांनानेमण्यात आले. 
         11 डिसेंबर1946 रोजी घटना समितीचे कायमचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली .
13 डिसेंबर रोजी पंडित नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली तिला संसदेने 12 जानेवारी 1947 रोजी मान्यता दिली.
           . या समितीमध्ये 22 इतर समित्या होत्या प्रत्येकाला घटना निर्मितीचे काम दिले होते या सर्वांमध्ये महत्वपूर्ण 
 मसुदा समिती होती 
             ज्याची निर्मिती 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. मसुदा समिती अंतर्गत सात सदस्य होते.
1) प्रक्रिया समिती,
2) वार्ता समिती 
3),संचालन समिती, 
4)कार्य समिती, 
5)संविधान समिती,
6) झंडा समिती ,
6)प्रारूप समिती. 
    मसुदा समितीमध्ये 
1) एन गोपाळ स्वामी आयंगर 
2)अल्लादी कृष्णस्वामी अय्यर 
3)मोहम्मद सादुल्ला 
4)के. एम .मुंशी 
5)डी एन मीतरयांच्या जागी एन .माधवराव 
6)डी.पी खेतान यांच्या जागी कित कृष्णामाचारी होते
.बाबासाहेब आंबेडकर यांची निवडणूक          
               दि राष्ट्रविभाजनापूर्वी बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांत मधील जे .सौर -खोलना या मतदारसंघातून घटना समितीवर निवडून आले होते .पण बंगाल हा अर्धा प्रांत पाकिस्तान मध्ये गेल्यामुळे आपोआपच बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्यत्व रद्द झाले त्यामुळे  पेच प्रसंग निर्माण झाला.
       बाबासाहेब आंबेडकर जर घटना समितीमध्ये नसतील तर भारताची राज्यघटना लिहिणे शक्य नाही याची पुरेपूर जाणीव आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व घटना समिती सल्लागार बी. एन. राव यांना होती त्यांनी
       बॉम्बे प्रदेशाचे मुख्यमंत्री बी .जी.खेर यांना सांगितले त्यांनी मुंबई येथील खासदार एम. आर. जयकर यांना राजीनामा देणे  सांगितले त्यामुळे बॉम्बे  येथील सदस्याची जागा रिकामी करण्यात झाली आणि तेथून बाबासाहेब आंबेडकरांची  घटना समितीवर पुन्हा  निवड करण्यात आली
     घटनेचे एकूण वाचन तीन झाले
   राज्यघटना लिहिण्यास दोन वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला म्हणजेच १०८२ दिवस लागलेत.64 लाख रुपये एकूण खर्च लागला .
       लोकशाही गणराज्य समाजवाद धर्मनिरपेक्षता मानवतावाद कल्याणकारी राज्य वसुदेव कम कुटुम्बकम विश्वशांतता अशा तत्त्वांचा सार असलेली राज्यघटना देशात लागू झालेला हा दिवस आहे..

तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे

दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...