Monday, 17 November 2025

किनवट नगरपालिका निवडणुका. प्रा संतोष गोपीचंद पवार

किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहसीलदाराने नगरपालिका कारभार पाहण्यासाठी शरीफ वकील यांची नियुक्ती केली. 
             स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम येथे सन 1952 मध्ये पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या या निवडणुका तीन वर्षाकरिता होत्या . निजामाचे प्रशासक म्हणून खानदेशातून आलेले सरदार शाहमदार खान दुर्रानी यांची निवड झाली
         1)    त्यानंतर सन 1956 ला हैदराबाद मुन्सिपल लागू करण्यात आला त्यानुसार सलग किनवट नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून 1961 पर्यंत कार्यरत राहिले. 
           2) त्यानंतर श्री. एस .नर्सिंमलु सुकरवार  सन 1962 ते 1964 मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर सन 1964 ते 67 मध्ये श्री टी गोविंदराव तिरमनवार यांनी अध्यक्ष म्हणून कार्य केले.
            महाराष्ट्र राज्याचा सर्वप्रथम नगरपालिका स्थानिक प्रशासनासाठी कायदा झाला तो सन 1965 मध्ये त्यानुसार किनवट पूरपालीकाही नगरपालिकेमध्ये परिवर्तित झाली. त्यानुसार प्रथमच या कायद्यानुसार निवडणुका झाल्या त्यामध्ये 1)श्री मलया मॅकलवार सन 1967 ते 1972
       उपाध्यक्ष म्हणून मा खैरुद्दीन खान यांनी कार्य केले .
2)श्री .किशनराव इटकेपेल्लीवार 1973- 7
 3)श्री मधुकरराव वट्टमवार 1975 -1979 
(ते पहिले  जनतेमधून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते.) 4)लक्ष्मणराव रागोलू नेमानेवार सन 1984 
5)गोपाळराव नारायणराव नेम्मानिवार सण 1986 
 6)इसा खान सरदार खान 1991 
 7)निसार खान 1992 
8)जगदीश मेनन 1997
9) दीपक नेमानिवार 1998 
10). दिनकर बाबुराव चाडावार 1999
11) व्यंकटराव मुकुंदराव नेमानीवार 2000
12) इसाखान सरदार खान 2000 (जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले होते.)
 13)अरुण लक्ष्मण आळणे 2005 
 14)मूर्ती यलप्पा कलगोटवार 2010 
 15)केवल कुमार नेमानेवार 2012 
16)सुनील किशनराव पाटील 2014 
 17) सौ.इंदुताई शत्रुघन कनाके(2016)
            ( पहिल्या महिला अध्यक्षा )
18) साजिद खान निसार खान 2019 
  19)आनंद मच्छीवार 2019 ते 20 23
     किनवट नगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत एकूण 22 वार्ड आहेत. सुरुवातीस केवळ विठ्ठल मंदिर परिसर ,वेलमापुराव, राम मंदिराचा परिसर हेच वॉर्ड होत
       2025 च नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण दहा प्रभाग आहेत त्यामध्ये 21 सदस्य निवडण्यात येणार आहेत. किनवट ची एकूण  मतदार संख्या ही 25593 आहे त्यामध्ये पुरुष 12334 आहेत तर महिला 13256 आहेत. बहुमत लाडकी बहिणीकडे आहे.02/12/2025 मतदान आहे सर्व मतदारांनी जागृत राहून आपल्या किनवट शहराचा विकास करावा यासाठी विचारपूर्वक मतदान करावे आणि नगराध्यक्षपदा वर जिम्मेदार कर्तबगार उमेदवाराची निवड करावी.

Friday, 14 November 2025

वीर बिरसा मुंडा प्रेरणेचा दीपस्तंभ :प्रा. संतोष गोपीचंद पवार

 आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी केलेल्या  प्रचार व प्रसारामुळे आपल्या आदिवासी संस्कृती परंपरा रूढी धर्म संकटात सापडला आहे. आदिवासी समाज त्याला बळी पडू नये  यासाठी आदिवासी समाजात जागृती केली. याशिवाय इंग्रज, मुसलमान मोगल  निजाम या जुलमी राज्य सत्तेच्या विरोधात आदिवासी समाजाला एकत्रित करून संघर्ष करण्याचे शिकविले. त्यांचे  व्यक्तिमत् संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
जन्म
       15/11/1875 मध्ये ओली हा तू या गावी जि. खुंटी येथे झाला हे ठिकाण पूर्वी बिहारमध्ये होते आज झारखंड मध्ये आहे. 
कुटुंब व संस्कार
        वडील सुगना व आई करमी हातू मुंडा असे होते त्यांना कोरामुंडा हा भाऊ होता. 
 विवाह:
  त्यांचा विवाह वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे सण1885 मध्ये अलमेश्वरी या मुलीशी झाला.
शिक्षण 
        बालपणी त्यांचा संपर्क ख्रिश्चन मिशनरी सोबत आला होता या क्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचं नाव ख्रिश्चन धर्मावर आधारित बिरसा दविद ठेवले होते .बुद्धिमान असलेल्या बिरसा मुंडा यांना त्यांचे कुटील डाव लगेच ओळखू आले    ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या  धार्मिक साम्राज्यवादी धोरणाला विरोध केला.
मित्र 
            जपसाल सिंह मुंडा ,सिंधो, कानू ,संपा, जगलू
घोषवाक्य 
         "अबुआ दिसुम,अबुवाराज , अबुआ नियम से चलाबा"  याचा अर्थ आपला देश आपले राज्य आपल्या नियमाने चालवू असा होतो.
क्रांती प्रेरणा :
       ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचार आणि जुलमी व्यवस्थे व्यवस्थित विरोधा स्वय प्रेरणेने प्रेरित झाले.
       सन १८९५ मध्ये त्यांनी उलगुलान म्हणजे क्रांतीची महान ज्योत पेटवली. खुंटी, तामार, सराय, केला या ब्रिटिश ठाण्यावर त्यांनी आक्रमण केले
   प्रत्यक्ष संघर्ष       
          हा परिसर छोटा नागपूर चा आहे यापूर्वी 1895. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली तुरुंगात दामले होते पुन्हा त्यांना तुरुंगातून सोडविण्यात आले होते परंतु त्यांच्या आक्रमणाच्या वाऱ्याच्या वेगाने बातम्या ब्रिटिशांच्या कानावर धडकू लागले त्यामुळे त्यांना खूप मोठ्या लष्करी संख्येने आक्रमण करावे लागले ब्रिटिश अधिकारी कॅप्टन विलीनसन आणि मेजर हिल यांच्या सैन्याशी त्यांचा सामना झाला तो डोंबारी  खुंटी या ठिकाणी अतिशय रोमांचक संघर्षामध्ये बिरसा मुंडा चे सर्व साथीदार वीरगतीस प्राप्त झाले यामध्ये बिरसा मुंडा यांना ब्रिटिश सैन्याने पकडले तुरुंगवास 
         9 जून 19 00 हा त्यांना रांची येथील तुरुंगात सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते तुरुंगात त ब्रिटिशांच्या अत्याचाराला ते बळी पडले कॉलरा झाला असा प्रचार करून त्यांचे प्रकरण दाबण्यात आले. 
          आज झारखंड सरकारने या ठिकाणाला त्यांची आठवण म्हणून बिरसा मुंडा स्मारक संग्रहालय म्हणून घोषित  केले तसेच यांच्या स्मरणार्थ झारखंड मुक्ती दिन हा जाहीर केलेला आहे..

स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा संतोष पवार

हातात दोन दगड घेऊन उभा राहणारा निरक्षर माणूस जेव्हा हजारोंची गर्दी जमवन त्यांच्या अंतकरणाचा ठाव घेणारा संत म्हणजे संत गाडगेबाबा होय. एकूण 80 वर्ष आयुष्यात त्यांनी 50 वर्ष समाजाची सेवा आणि प्रबोधन कार्य केले. सुरुवातीला अज्ञानी जनतेने त्यांना हि नवले पण नंतर लगेच जनतेच्या लक्षात आले की हा व्यक्ती महान संत आहे.
 ्जन्म वर्ष 
           23 फेब्रुवारी  1876 ला झाला .
 स्थळ 
          अमरावती जिल्ह्यातील शेणगाव मूर्तिजापर तालुका येथे झाला बाळ धाकट व गुबगुबीत असल्यामुळे त्यांना डेबू हे ठेवण्यात आले. 
जात :    भिल्ल
शिक्षण 
     त्यांचे शिक्षण कोणत्या शाळेत झाले नाही ते निरक्षर होते. अनुभवाच्या शिक्षणातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. 
 आई वडील 
        झिंगरोजी व आई सखुबाई हे दांपत्य होते .झिंगरोजी यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्याकडे असलेली जमीन दौलत सावकाराने घेऊन टाकली त्यामुळे त्गाव सोडून त्यांना सखुबाई ने आपल्या मावस भावाकड कोतेगाव येथे आणले .तेथे झिंगरोजी दारूच्या व्यसनामुळे आरोग्य स्थिती बिघडत राहिली त्यात त्यांचा तरुण अंत झाला. त्यानंतर सखुबाई आपल्या भावाकडे आल्या मुर्तीजापुर तालुक्यातील दापुरे या गावी आल्या
         येथून आज दिबुजी यांना वैराग्याची दीक्षा मिळाली. मामाकडे 65 एकर शेती होती त्यावर सावकाराने आपला हक्क सांगितला आणि ती मामाकडून घेऊन टाकली पण डेबुजी यांच्या हुशारपणामुळे ती परत मामाकडे आले सर्व गावातील महार ,मांग ,चांभार , बहुजनांची सर्व मुलं  डेबुजी यांच्यासोबत मिळून बसून जेवण करत.
प्रेरणा 
      समाज सुधारण्याची प्रेरणा हे त्यांना मुळातूनच होती तरी देखील संत तुकाराम ज्ञानेश्वर संत एकनाथ संत चोखामेळा अशा अनेक संत परंपरेतून गरीब जनतेवर होत असलेल्या अन्याय ,अत्याचार, शोषणा विरोधातील कळकळ यातून त्यांना समाज सुधारणा प्रेरणा मिळाली.
  विवाह
     सोहळा यावर्षी  कुंता बाईशी झाला. संसारात रमले होते त्यांना आलोका व कलावती य दोन मुली व एक गोविंद नावाचा मुलगा होता.हे पाहून आईला खूप आनंद झाला होता. आजोबा हंबीरराव हे घरचे कर्ते पुरुष होते .
संन्याशाची भेट 
       सन 1904 मध्ये एका संन्याशा सोबत त्यांची भेट झाली वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी म्हणजे 19 05 ला घराचा त्याग केला बारा वर्षे सतत देशभर त्यांनी भटकंती केली टाळ, मृदंग, मंडप ,तबला ,दिवाबत्तीची जनता करत होती.
 वेशभूषा:
     डोक्यावर फाटकी टोपी हातात फुटलेले गाडगे ,अंगात फटका चिंध्या असलेला झबला ,धोतर, हातात काठी अशा प्रकारची त्यांची वेशभूषा होती. हातात टाळ आणि मृदंग घेऊन स्वतःच किर्तन करत होते. 
प्रवास
कधी रेल्वे बस तर कधी पायी प्रचंड प्रवास त्यांनी केलेला आहे या प्रवासात प्रत्येक गावाला ते जात होते प्रथम त्या गावाची स्वच्छता स्वतःच्या हाताने करत होते त्या मोबदल्यात ते काहीही मागत नव्हते. त्यांच्या कीर्तनामुळे ग्रामीण भागातील जनता प्रभावित होऊ लागली.

 कीर्तन, प्रवचन, ढोलकी ,वादन विषय 
          सन 1931-40 पासून खऱ्या स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन, प्रबोधन शिक्षण याबद्दल होते स्वतःच्या आवाजात कीर्तन करत त्यांचा आवाज खूप छान होता. कीर्तनाभारत देशात प्रसिद्ध झाले. मूर्ती पूजा नवस बळी प्रथा जातीभेद शिवाशिवी या प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला प्रत्येक कीर्तनातून हाच उपदेश लोकांना देत त्यामुळे लोकांनी त्यांच्या वर्तनावरून व निस्वार्थी आचरण व प्रतिकृती विचारे कर्मयोगी म्हणून त्यांच्या कार्याची मूल केले त्यांचा उपदेश रोजच्या जीवनाशी संबंधित होता त्यामुळे ध्यान मग्न होऊन आपले जीवन कर्म सुधारावे याचा विचार करील गाडगेबाबा आवर्जून सांगायचे* बापू हो दारू पिऊ नका"* 
कर्ज काढून सन साजरी करू नका "
परोपकार करा गरिबावर दया करा
 माय बापाला दूर करू नका
  कोंबडे बकरी कापू नका असा सतत उपदेश करायचे. बाबाच्या कीर्तनामुळे लोक आत्मपरीक्षण करत होते. 
वृद्धाश्रम समाजसेवेच्या अनेक संस्था 
गावोगावी जाऊन "गोपाळा गोपाळा ,देवकीनंदन गोपाळा"असे कीर्तन करत होते.  त्यांच्याकडे जमा झालेल्या संपत्तीचा  वापर त्यांनी गोरगरीब दरिद्री जनतेच्या कल्याणासाठी केला त्यातून अनेक ठिकाणी समाज  कल्याणकारी संस्थांची निर्मिती केली. समाजाकडून मिळालेल्या एकही पैशाचा वापर त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी केला नाही.
समाधी 
          20 /12 /1956 रोजी दिल्ली या ठिकाणी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी त्यांनी जगाला निरोप दिला. त्यांची समाधी वालगाव, मोझरी अमरावती जिल्ह्यातील गावी आहे.

Thursday, 13 November 2025

संत फुलाजी बाबा ध्यानधारणेतून तेजस्वीपणाकडे जाणारा संत

ध्यानधारणेतून मानव सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन जगू शकतो असा संपूर्ण विश्वाला संदेश देणारे योगी म्हणजे संत फुलाजी बाबा होय. ध्यानधारणेच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशातील समाजात जागृती केली. ते एका जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. तत्कालीन समाज हा अंधश्रद्धा अनिष्ट रूढी प्रथा परंपरा अज्ञान दारिद्र्य बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी त्रस्त होता या परिसरात असलेल्या आंध जमात, बंजारा समाज व बहुजन समाजाच्या जीवनामध्ये अतिशय चांगली परिवर्तन त्यांच्यामुळे घडवून आले.
जन्म 
        30 ऑगस्ट 1925 रोजी सावळी ता औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली झाला.
आई -वडील
       त्यांचे वडील धोंडीबा इंगळे आई पुंजाबाई इंगळे हे एक शेतकरी कुटुंब होते. वडील उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशात गेले आणि तिकडेच स्थायिक झाले.
शिक्षण :
    प्राथमिक शिक्षण सावळी येथे झाले. स्वयं अध्ययन अनुभव व्यावहारिक जीवन अन्यायाविरुद्ध प्रचंड प्रतिकार समाजात असलेल्या प्रथा त्याबाबत असलेले ज्ञान साधना यातून स्वयं पेरणीने शिक्षण झाले. 
प्रेरणा 
        समाजात असलेले प्रचंड दारिद्र्य त्याचे कारण त्यामुळे शोषित समाजाला त्यातून बाहेर काढण्याची उत्स्फूर्त प्रेरणा त्यांना ध्यान धारणीतून मिळालेली आहे.
कार्य 
कोणत्याही एका जाती पुरते किंवा धर्मापुरते  मर्यादित स्वरूपाचे त्यांचे कोणतेही काम नव्हते. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत तसेच कच्छ ते अरुणाचल प्रदेशातील सिलचर पर्यंत त्यांचे कार्य पसरलेले होते.
ध्यानधारणा केंद्र उभारणी 
           250 चावर ध्यानधारणा केंद्रांची स्थापना मराठवाडा विदर्भ आंध्र प्रदेश तेलंगणा या परिसरात झालेली आहे. विदेशातून देखील यात्री भक्त तेलंगणा मधील पटनापूर मंडळ जैनुर ता उटनूरजि. आदिलाबाद येथे दर्शननासठी येतात.
संपूर्ण देशात त्यांच्या यात्रा 
         1)सन2008 नांदेड येथे झालेल्या शीख धर्माच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने गुरुजी कार्यक्रमांमध्ये त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
           2)सन 2012 मध्ये कश्मीर मधील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांमध्ये मानव जातीच्या कल्याणा बाबत त्यांनी उपदेश दिला होता.
              3)सन 2013 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरास त्यांनी 200 अनुयायासह भेट दिली.
शिकवण 
"मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" याप्रमाणे संत फुलाजी बाबा यांनी दुःखी व पिढीत जनतेचे दुःख दूर करण्याचा मार्ग दाखविला. 
1) विश्वामध्ये आपण आहोत आपल्यामध्ये विश्व आहे तोच ईश्वर आहे.
2 )प्रत्येक व्यक्तीने धनासाठी नाही तर जनासाठी कार्य करावे. 
3) साधी राहणी उच्च विचारसरणी ठेवावे. 
4) जातिभेद व धर्म भेद करू नाही. 
5 )ध्यानधारणा हे अंतिम सत्य आहे 
6 )स्वच्छ मनाने व उदात हेतूने जनमानसाची दुःख दूर करावे.
समाधी 
आंध्र तेलंगणात असलेल्या उठनुर येथे त्यांची समाधी आहे.


Wednesday, 12 November 2025

2025 किनवट जनतेस नगरपालिका अध्यक्ष कसा हवा आहे

सुखी जीवनाचे रहस्य -प्रा संतोष गोपीचंद पवार

सुखी जीवनाचे रहस्य महाभारत जय ग्रंथ, रामायण तसेच विविध काळात घडलेल्या संतांनी वेळोवेळी सांगितलेले आहे. चिंता म्हणजे चिता उदास राहण्याऐवजी नेहमी निरंतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे त्याला चिंता म्हणत नाही तर संघर्ष म्हणतात.
 महाभारतातील शांती पर्व आणि अनुशासन पर्व या भागात *संतोषात परम सुकम" असे म्हटले आहे.
*उद्धरेदात्मनाsत्मान  नात्मा नमवसादयेत!
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपूरात्मन:||"
संत तुकाराम याबाबत असे म्हणता 
* जो काही होईल ते चांगलेच होईल,  आत्म राम चि पाहे अंतर भावे"
संत कबीर दास याबाबत असे म्हणतात की 
* साधो यह तन सुर की वाणी मन चंगा तो कठोती मे गंगा|"
संत ज्ञानेश्वर याबाबत असे म्हणतात की 
* संतोषी जना ची सतत राहे समाधी"
संत एकनाथ महाराज यासंदर्भात म्हणाले होते की, 
*आपुलाची आपण आपुला होईल उद्धार"म्हणजे मनुष्याने स्वतःच्या प्रयत्नांनी आणि विचारशुद्धीने स्वतःचा उद्धार करावा. 
याबाबत समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात की 
* मन सुखाचे कारण मनघि असते."
*मनाशी जिंकले तो विश्वाशी जिंकला, आपल्या मनाचा जो होईल राजा तोच सुखी होईल साचा".
*मनाचे समाधान खरे मुक्तीचे कारण आहे".

Wednesday, 5 November 2025

नांदेड येथील गुरुद्वारा एक ऐतिहासिक स्थळ प्रा संतोष गोपीचंद पवार.

गुरु गोविंद सिंग यांचा अल्प परिचय. :
 जन्म 
        दिनांक 22 डिसेंबर 1666 रोजी पाटणा बिहार येथे श्री गुरु तेज बहादुर व माता गुजरी यांच्या कुटुंबात झाला.
गुरु गादीपदावर 
       सन 1675 मध्ये त्यांना वयाच्या नव्या वर्षी गुरु पदी बसविण्यात आले . त्यांनी आपल्या वयाच्या 42 वर्षापर्यंत प्रचंड रोमहर्षक लढा हा मोगल सत्तेला दिला त्यांच्या कालखंडात संपूर्ण शीख समुदाय हा एकत्र आला आणि त्यांनी मोठी झुंज ही परकीय सत्तेला दिली.
विवाह 
         त्या काळातील समाज जीवनानुसार त्यांचे तीन विवाह झाले त्यांचा पहिला विवाह अकरा वर्षाचे असताना 1677 मध्ये माता जीतोजी सोबत बासुंदी येथे झाला. अजित, झुंजार ,झोरावर हे तीन पुत्र यापासून त्यांना झाले.तर  दुसरा विवाह माता सुंदरी जी 1684 सोबत आनंदपुर या स्थळी झाला त्यांना एक पुत्र फतेहसी झाला.. तर तिसरा विवाह 1697 ला माता जी कौर साहेब ह्या खालसा पंथाच्या माता बनल्या.
 ग्रंथरचना 
1)दशम ग्रंथ 2),जाफरनामा ३)विचित्र नाटक 5)चंडी दि वार
5)अकाल उसत 6)जाप साहेब बानी रचना पंजाब हिंदी ब्रिज संस्कृत आर बी आणि फारशी या विविध भाषां मधील महत्त्वपूर्ण रचनां यांचा समावेश  गुरु ग्रंथ साहिब या महान ग्रंथांमध्ये केली. 
खालसा पंथची स्थापना
: 13 एप्रिल 1699 मध्ये आनंदपुर साहेब येथे  केले. तेथील समुदायाला आव्हान केले होते की "कोण है जो धर्मासाठी आपले मस्त अर्पण करेल? त्यात सर्वात आधी पंच प्यारे समोर आले त्यामध्ये
1) भाई दया सिंह, लाहोर
2) भाई धर्म सिंह ,दिल्ली
3) भाईमोहक्कम सिंह ,जगन्नाथ पुरी
4 ) भाईहिम्मत सिंह ,द्वारका
 5)भाई साहेब सिंह, बिदर 
खालसा म्हणजे पवित्र वीर आणि धर्मनिष्ठ होय.
 युद्ध 
त्यांच्या जीवनात एकूण 14 लढाया झाल्या त्यामध्ये चार युद्ध ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.1)1688 मध्ये राजपूत राजा
 भोपसग यांच्यासोबत झाले. या युद्धात प्रचंड पराक्रम करून विजय मिळविला हे त्यांच्या जीवनातील पहिले युद्ध होतं
.2) 1700आनंदपुर साहेब या ठिकाणी मोगलांसोबतयुद्ध  झाले.3) सन 1704 चमककौर युद्ध झाले. मोगलांचा वजीर नवाब  खान सोबत झाले या युद्धात त्यांचे दोन पुत्र वीरगती प्राप्त झाली प्रचंड पराक्रम त्यांनी गाजविला होता.
4) सन 1705 मुखलीस गड युद्ध हे मोघलांसोबत झाले या युद्धात गुरुगोविंद सिंग यांचा प्रचंड विजय झाला.
    शीख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंग जी यांनी आपल्या नंतर कोणीही जिवंत मानव हा गुरु पदी नको एक सत्य हाच गुरु बनला पाहिजे त्याकरिता ग्रुप ग्रंथ साहिब या ग्रंथांची निर्मिती केली आणि त्यांना नांदेड येथील गुरुद्वार यमध्ये गुरुची गादी ही 20 ऑक्टों.1708 मध्ये प्रधान केली. गोदावरी नदीकाठी असलेल्या बंदा बैरागी यांना प्रेरणा देऊन उत्तर भारतात पंजाब मध्ये पाठविले तेथील मोगलांचा अन्याय वअत्याचार तसेच हिंदू धर्माचे रक्षण करण्या साठी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली व एक स्वतंत्र पंजाब राज्याची निर्मिती केली. त्याने मोगलांच्या पूजेला थरारक झुंज दिली त्यामुळे एक सोनेरी किनार भारतीय इतिहासाला मिळाली. सन 7 ऑक्टोंबर 1708 मध्ये मृत्यू झाला. 
नांदेड मध्ये एकूण आठ गुरुद्वारे आहेत त्यामध्ये 
1)तख्त सचखंड श्री हुजूर आबी चलनगर साहेब 
2)गुरुद्वारा संगत साहेब
 ३)गुरुद्वारा मालटेकडी साहेब
4) गुरुद्वारा शिकार घाट 
5)गुरुद्वारा हिरा घाट सहेब
6) गुरुद्वारा माता साहेब. देवाजी
7) गुरुद्वारा बंदाघाट साहेब
8) गुरुद्वारा नगीना घाट साहेब 

तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे

दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...