शनिवार, ४ जुलै, २०२६

मुस्लीम तेली . किनवट

किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आहे आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणारा हा समुदाय आहे. यांची भाषा केली आहे ज्यावर राजस्थान युपी येथील भाषेचा प्रभाव दिसून येतो. हा समुदाय मनमिळावू आहे इतिहासामध्ये पाहिले तर या समाजाने देशाच्या संरक्षणासाठी संघर्ष देखील केलेला आहे राजस्थान उत्तर प्रदेश या मूळ घटक राज्यांमधून भ्रमण कधीच ही जात महाराष्ट्रात आलेली आहे शुद्ध तेलाचा व्यापार करणे आणि त्याद्वारे उपजीविका परिवाराचा उदरनिर्वाह करणे हे कार्य ही जात करते. ऐतिहासिक विकासाच्या कालखंडात राजस्थानमधील 153 तेली जातीमधील 53 जाती ह्या त्यातून फुटून इस्लाम धर्माचा स्वीकार त्यांनी केला त्यामुळे मुस्लिम समुदायातील तेली समाजात 53 गोत्र दिसून येतात. या जातीवर भारतीय परंपरेचा प्रभाव आहे त्यामुळे काही कुटुंबामध्ये भारतीय संस्कृतीचे पालन केल्या जाते. या समाजातील पुरुष हे दीपाळ गोर वर्ण तसेच क्षणाक्ष दिसून येतात व्यापारामध्ये चतुर ही जात आहे कौशल्यपूर्ण व्यापार करणारी ही जात आहे किनवट परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम तेली आहेत या जातीमधील स्त्रिया देखील फार सुंदर मनमिळावू हुशार कुटुंब वत्सल्य आहे. मुला मुलींचे विवाह हे दुसऱ्या गोत्रातील विवाह संबंध जोडल्या जातात परिवारामध्ये विशिष्ट पद्धतीने लहान मुला मुलींवर संस्कार केल्या जातात एका कुटुंबात दोन आपत्य हे सरकारी नियमांचे पालन देखील या समुदायात केल्या जाते इतिहास कालखंडात अनेक कारणांमुळे  या समुदायाने हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात प्रवेश केला. चव्हाण, बडगुजर, जाधव अशा अनेक आडनावाची कुटुंबे या समुदायात दिसून येतात. 

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

मथुरा लभान समाज-किनवट

किनवट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मथुरा लभान हा समाज राहतो हा समाज गाई धनाचे पालन पोषण करतो. लाखा मध्ये गाई बैल यांची संख्या असते संपूर्ण भारत तसेच विदेशामध्ये देखील पशुधन घेऊन जाणारी भटकी जात म्हणून याला ओळखल्या जाते बंजारा या समुदायातील एक जात ही मथुरा लहान आहे एकूण 14 जाती ह्या बंजारा समाजामध्ये आहेत प्राचीन व मध्ययुगीन कालखंडात स्वदेशी सत्तेच्या संरक्षणासाठी मथुरा लगान समाजाने मोठे योगदान दिलेले दिसून येते देशी सत्तांना अन्नधान्य पुरवठा करणे त्यासाठी गाई बैल यांच्या धान्य पोहोचविण्यासाठी  पावसाळा हिवाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये आकाश हेच छत असलेली ही जमात कशा पद्धतीने निसर्गाच्या संकटाचा सामना करते हे जाणून घेण्यासारखे आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल दल दल यापासून संरक्षण व्हावे यासाठी ज्या ठिकाणी ही जमात जात होती त्या ठिकाणी हे मुरूम खडक असलेल्या डोंगरावर आपले वस्ती स्थान करत होती त्यामुळे चिखल होण्याचा प्रश्न नाही गाई ढोर आणि त्यांना खाण्यासाठी चारा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध असे सन 1883 च्या सेटलमेंट ॲक्ट कायद्यानुसार या जमातीला गुन्हेगार जमात म्हणून ब्रिटिशांनी घोषित केले होते यामुळे ज्या ठिकाणी ही जमात जाईल तेथील समाज गुन्हेगार म्हणून या जातीला समजत असे हा ब्रिटिश काळात साम्राज्याची देण होता त्यामुळे या कायद्यातून मुक्त होण्याचे प्रयत्न या समाजाने केले होते 1960 च्या कायद्यामुळे या सेटलमेंट ऍक्ट कायद्यातून सुटका झाली त्यामुळे मुक्त हे जात झाली त्या करिता भटक्या जमाती म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये या जमातीचा समावेश करण्यात आला 
 या समाजातील स्त्री-पुरुष हे खूप सुंदर आणि गोर आहेत चेहरा अत्यंत तेज आणि सुंदर आहे स्त्रिया तर या समाजात खूप सुंदर असतात स्त्रियांना महालक्ष्मीचे रूप समजल्या जाते ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल ते कुटुंब धन्य होत असे कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे भाग्याचे लक्षण होतं आहे मुलगी झाल्यानंतर त्यांची विशिष्ट प्रथा आहे दुर्गा मातेची पूजा ही करण्यात येते मुलाचं बारसं केल्या जाते तर मुलीचं वेगवेगळ्या पद्धतीने वयानुसार कार्यक्रम घेण्यात येतात त्यांचे नामकरण विशिष्ट पद्धतीने ठेवल्या जातात पुरुष हे धष्टपुष्ट तर स्त्री ही आकर्षक सुंदर आहेत 
.
 तांड्याच्या मध्यभागी नायकाचे घर किंवा तंबू हे असंच तसेच त्यांच्यासमोर हनुमान हा दक्षिणमुखी मारुती मंदिर असाच आध्यात्मिक दृष्टिकोनातून मथुरा हा समुदाय श्रीकृष्णाचे भक्त आहेत श्रीकृष्णाचा काला हा तर फार चविष्ट बनविल्या जाते विशिष्ट पद्धतीने गव्हाचे चपात्या बनवल्या जातात चविष्ट असतात श्रीकृष्णाचा काला असे त्याला म्हणतात श्रीकृष्णाची हंडी हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील प्रत्येक वर्षी घेण्यात येतो मुलींना या समाजात हुंडा देण्यात येतो मुलांकडून हुंडा घेतल्या जातो ही एक चांगली प्रथा स्त्रियांसाठी आहे प्रगत समाजासाठी समाजासाठी हा एक आदर्श आहे पुरुष हा कारभारी असतो तर त्याला साथ देणारी स्त्री ही अर्धांगिनी असते कुटुंबाच्या प्रत्येक निर्णयांमध्ये पुरुष हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो तर स्त्री ही त्यामध्ये सहभाग घेत असते लाखा लहान असे देखील म्हटले जाते ज्याकडे लाख बैल गाई असतात त्याला लाखा म्हटल्या जातं
 या समुदायाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना मोठ्या संख्येने असलेले जनावरे यांचा पालन पोषण कसे करतात या समुदायाचा नायक हा प्रचंड हुशार असतो तो ज्या भूप्रदेशात जातो तेथे सर्वप्रथम परीक्षण निरीक्षण संशोधन हे करतो तेथील भौगोलिक परिसरातचे संशोधन केल्यानंतर तो जागा निवडतो या परीक्षांमध्ये मातीच्या वासावरून या ठिकाणी वीर खणल्यास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल का नाही हे जाणून घेतो तसेच मोठ्या प्रमाणात साऱ्याची व्यवस्था या परिसरात होते का हे बघितले जाते तेव्हाच तांड्याचा नायक हा तेथे आपला तांडा वसई तो हिवाळ्या या ऋतूमध्ये तर परिस्थिती सर्वसामान्य असते थंडीपासून बचाव व्हावा म्हणून गोधडे व अंगरखा हा परिधान करण्यात येतो 
 आसपासचा परिसर हा स्वच्छ ठेवल्या जातो तसेच दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छता राखण्यासाठी दुधाचा वापर करण्यात येतो तसेच शरीर हे सुंदर व्हावं याकरिता तुपाचा वापर हा करण्यात येतो घराच्या विशिष्ट कोपऱ्यात स्नानगृह असते तसेच अंगण हे मोठे असते कारण काय ढोरे बांधण्याची व्यवस्था तसेच गोबराचा सडा हा मोठ्या प्रमाणात टाकल्या जातो पारंपारिक ज्ञानानुसार गोबराच्या सड्यामुळे सूर्यकिरण गोबरा चाकणावरून व्यक्ती व परिवाराच्या अंगावर पडतो त्यामुळे विशिष्ट ऊर्जा आणि रोगराई पासून संरक्षण हे होत असते गाई तसेच म्हशीचे विविध घटक हे मानव जातीला खूपच हितकारक असतात ज्या समुदायांमध्ये जनावराची संख्या ही जास्त असते त्या ठिकाणी संकट हे कमी येतात कारण जनावरे ती संकटे दूर लोटतात सर्वात आधी या जनावरांनाच संकटाची चाहूल लागते.
 तेज बहादुर या नव्या शिक धर्माच्या गुरु सोबत समाजाचा संपर्क आला त्यामुळे शीख धर्मा च्या परंपरांचे पालन करताना देखील हा समाज दिसून येतो त्यामुळे या समाजात गुरुद्वारे देखील बांधलेले दिसून येतात
 किनवट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मथुरा लभाण   ताड्यांची संख्या थारा चंद्रपूर सावरी नीच पूर्वाई मांडवी मांडवा अशा अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने आहेत.

मुस्लीम तेली . किनवट

किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आ...